महाराष्ट्रातील राजकारणातील आणखी एक राजकीय कुटुंबात फूट पडलीय. या फुटीमुळे पुन्हा एकदा काका-पुतण्या आमने-सामने आलेत. ही राजकीय घडमोड नांदेडमध्ये घडली असून अजित पवार गटाने भाजपला धक्का दिलाय. भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे पुतणे उदय चव्हाण काकांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का असून नांदेडमधील राजकारण मोठी खळबळ उडालीय.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पक्ष वाढीसाठी काम करत आहेत. इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश करून घेत आहेत. मात्र यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या्ंनी चंद्रशेखर बानवकुळे यांच्यावर खरमरती टीका केली होती. त्याला अशोक चव्हाण यांनी सपकाळ यांना जोरदार उत्तर दिलं होतं. बावनकुळे हे पक्ष वाढीसाठी काम करत आहेत, असं चव्हाण म्हणाले होते.
त्याचदरम्यान महायुतीमधील मित्र पक्ष असलेले अजित पवार गट राष्ट्रवादीने भाजप आणि अशोक चव्हाण यांना धक्का दिलाय. चव्हाण यांचे पुतणे उदय चव्हाण यांचा पक्षात प्रवेश करून घेणार आहेत. दरम्यान उदय चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती देताना आमदार चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांना चिमटा काढलाय. 'ज्याचं त्यांन घर संभाळावं' , असा खोचक सल्ला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना दिला. त्यामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे.
उदय चव्हाण हे ११ मे रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.अजित पवार तिसऱ्यांदा नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील. त्याचवेळी उदय चव्हाण हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे, मंत्री दत्ता भरणे, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री इंद्रनील नायक देखील या पक्ष प्रवेशावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती राष्ट्रवादी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलीय.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत खासदार अशोक चव्हाण यांचे पुतणे उदय चव्हाण यांच्यासह अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. उद्या चव्हाणांना राष्ट्रवादीत घेऊन तुम्ही अशोक चव्हाण यांच्या घरात एंट्री केली, या प्रश्नावर बोलताना चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांना खोचक सल्ला दिला. ज्याचे त्यांनी घर सांभाळावं, असं वक्तव्य आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.