Nanded Crime News, nanded, police Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : काेट्यावधीची खंडणी...गोळीबाराचं थरारनाट्य...सिनेस्टाईल पाठलागानंतर महिलेसह तिघे पाेलिसांच्या ताब्यात

ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चाैकशी सुरु आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News : नांदेड जिल्हयातील एका कंत्राटदाराला एक कोटीची खंडणी मागणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी पोलीसांनी सापळा लावला हाेता. परंतु संशयितांना याची कुणकुण लागताच त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील संशयितांवर गोळीबार केला. या घटनेनंतर पाेलिसांना तीन जणांना अटक करण्यात यश आले. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार नांदेड येथील कंत्राटदार तेजस लोहिया यांना फोन करुन संशयितांनी एक कोटीची खंडणी मागितीली. आम्ही कुख्यात गुंड असल्याची धमकी त्याने तेजस यांना दिली. त्यानंतर तेजस लोहिया यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

पाेलिसांच्या मार्गदर्शनानंतर तेजस यांनी संशयितास बाेलून दोन लाख देण्याचे निश्चित केले. संशयितांना तेजस लाेहिया यांना नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील ढाकणी गावाजवळ येण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. पैसे घेण्यासाठी संशयित कारने आणि दोन दुचाकी वरुन आले हाेते.

महिलेसह तिघे ताब्यात

दरम्यान संशयितांना पाेलिसांची कुणकुण लागताच त्यांनी हालचाली केल्या. त्यानंतर पाेलिसांवर गाेळीबार देखील केला. त्यास पाेलिसांनी उत्तर गाेळ्या झाडून उत्तर दिले. यावेळी संशयितांनी पळ काढला. पाेलिसांनी त्यांचा पाठलाग करुन तिघांना ताब्यात घेतले. या संशयितांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tilgul Ladoo Benefits: थंडीत रोज एक तिळगूळ लाडू खा, कॅल्शियम वाढेल अन् हाडं होतील मजबूत

Indurikar Maharaj: 'मला बोला, माझ्या मुलीचा काय दोष?' ग्यान देणारे इंदोरीकर कीर्तन सोडणार?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी पात्रता काय? कोण करु शकणार? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी मुरलीधर मोहोळ घटनास्थळी पाहणी करणार

Bihar Election Result Live Updates: तेजस्वी यादव १२०० मतांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT