Nanded Crime  Saam TV
महाराष्ट्र

स्वत:ला वाचविण्यासाठी पाेलिसांनी केला गाेळीबार; गुंड दिलीप डाखोरे जखमी

डाखोरेवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून तो बिगानिया गँगचा सदस्य असल्याची माहिती प्रमोदकुमार शेवाळे (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांनी दिली.

संतोष जोशी

नांदेड : नांदेड (nanded) येथे फौजदाराची बंदुक हिसकावून पोलिसांवर बंदुक रोखणाऱ्या एकास पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी गोळीबार करुन पकडले. या गोळीबारात संबंधितास पायाला गोळी लागली आहे. हा थरार गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास लोहा येथे घडला. दिलीप डाखोरे असे पकडण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे अशी माहिती पाेलीसांनी (police) दिली. (nanded latest marathi news)

याबाबतची अधिक माहिती अशी : ३० एप्रिलला तुप्पा येथे दिलीप डाखोरे याने सतिश कसबे याच्यावर गोळीबार केला होता. गोळी लागली नसल्याने त्याच्यावर हल्ला करुन डाखाेरे फरार झाला होता. त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी परभणी (parbhani) जिल्ह्यातील पालम (palam) येथून ताब्यात घेतले आणि लोहा येथे आणले.

तेथे डाखोरे याची चौकशी करत असताना फौजदाराच्या कंबरेची बंदुक डाखोरेने हिसाकावून घेतली. त्याने पोलिसांवर बंदुक रोखत पळून जाण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस निरीक्षक चिखलीकर यांनी डाखोरे याला बंदुक देऊन पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे आवाहन केले. परंतु ताे ऐकत नाही आणि आक्रमक हाेत असल्याचे लक्षात येताच अखेर डाखोरेच्या पायावर चिखलीकर यांनी गोळी झाडली. यात डाखोरे जखमी झाला. डाखोरेवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून तो बिगानिया गँगचा सदस्य असल्याची माहिती प्रमोदकुमार शेवाळे (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT