Bribe Saam tv
महाराष्ट्र

नांदेड: दोन बिल्डरला एक कोटींची खंडणी! खंडणीबहाद्दर पोलिसांच्या ताब्यात

निनावी पत्राद्वारे मागितली खंडणी

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

संतोष जोशी

नांदेड: बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पसरलेल्या दहशतीचा फायदा घेत एका खंडणीबहाद्दराने नांदेडच्या दोन बांधकाम व्यावसायिकांना एक कोटीची खंडणी मागितल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास चक्रे फिरवून पत्राद्वारे एक कोटीची खंडणी मागणाऱ्या खंडणी बहाद्दराला अटक केलीय. पुरूषोत्तम मांगूळकर असं या खंडणीबहाद्दराचं नाव आहे.

दोन दिवसापूर्वी श्याम गुप्ता आणि कौस्तुभ फरांदे या बांधकाम व्यावसायिकाला एक कोटीची खंडणी मागत जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवले होते. या बांधकाम व्यावसायिकांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. पोलिसांनी तपास करत खंडणीबहाद्दराचा छडा लावला. खंडणी बहाद्दर हा मुळचा हिमायतनगर येथील असून तो सध्या नांदेडमध्ये वास्तव्यास आहे ही बाब पुढे आली.

हे देखील पहा-

पुरुषोत्तम मांगूळकर यास पोलिसांनी अटक करुन त्याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येनंतर खंडणी बहाद्दर सक्रीय झालेत. काहीजण एकमेकांचे शत्रुत्व काढण्यासाठी निनावी पत्राचा प्रपंच करत आहेत. त्यातलाच हा प्रकार असल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT