Nanded Latest News Saam TV
महाराष्ट्र

Nanded News : मासेमारी करण्यासाठी गेले अन् अनर्थ घडला; तीन सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू

Nanded Latest News : पोचरा नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तीन सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आदिलाबाद जिल्ह्यातील नागापूर येथे घडली.

Satish Daud

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

पोचरा नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तीन सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील नागापूर येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही भाऊ नांदेड शहरातील (Nanded News) नवी आबादी परिसरातील रहिवासी होते. मोलमजुरीच्या कामासाठी ते तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील नागापूर येथे गेले होते. दहीहंडीच्या दिवशी कामाला सुट्टी असल्याने ते मासे पकडण्यासाठी पोचरा नदीत गेले.

यातील एक तरुण मासे पकडण्यासाठी नदीपात्रात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी इतर दोन भावंडांनी पाण्यात उड्या घेतल्या. परंतु कोणालाही पोहता येत नसल्याने तिघेही खोल पाण्यात बुडाले.

दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. बचाव पथकाच्या मदतीने तिन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. नदीपात्रात बुडून तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याने नवी आबादी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Maharashtra News Live Update: CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा सवाल; तातडीच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT