Vishnupuri Dam, Nanded, Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Nanded Water Shortage : नांदेड शहरात होणार पाणीकपात; विष्णूपुरी धरणात २५ टक्केच पाणीसाठा

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी, नांदेड


Nanded Dam Water Level
: यंदा कमी पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अनेक भागात विहिरींचे झरे आटल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशात आता (Nanded) नांदेड शहराला पाणी पुरवठा (water Scarcity) करणाऱ्या विष्णुपुरी धरणात देखील सद्या २५ टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामूळे आगामी काळात शहरात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. (Tajya Batmya)

राज्यात यंदाच्या पावसाळ्यात अल्प पाऊस (Rain) झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी संकट उभे राहिले आहे. काही भागात तर फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. धरणात असलेला पाणी साठा देखील कमी होऊ लागला आहे. यामुळे आगामी उन्हाळ्यातील दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. यामुळे प्रशासनाकडून देखील टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाणी कपातीची शक्यता 

सध्या नांदेड शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. येत्या आठवड्यात पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या (Vishnupuri Project) विष्णूपूरी धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित कऱण्यात आला आहे. दरम्यान नांदेडकरानी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून १२ वर्षीय मुलीने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO

ऋषभ पंतची एक चलाखी आणि...; रोहित शर्माने ३ महिन्यांनी सांगितलं कशी पालटली भारताने हरलेली बाजी!

Vidhan Sabha Election : बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का; एकुलता एक आमदार फुटला, शिंदे गटाने पळवला

SCROLL FOR NEXT