Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : आमदार बालाजी कल्याणकरांना मराठा आंदोलकांचा घेराव; रस्ता अडवत विचारला जाब

Nanded News : आज शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाला समोर जावं लागलं आहे.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. आमदार बालाजी कल्याणकर यांना उत्तर नांदेड मतदार संघातील सोमेश्वर येथे मराठा आंदोलकांनी अडवले. तसेच याठिकाणी आमदारांना घेराव घालत मराठा आरक्षण देण्याबाबत जाब विचारला. 

सध्या मराठा आंदोलक अनेक नेत्यांना अडवून जाब विचारात आहेत. भोकर विधानसभा मतदार संघात भाजपाचे खासदार अशोक चव्हाण त्यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण आणि कन्या श्रीजया चव्हाण यांना देखील (Maratha Aarkshan) मराठा आंदोलकांनी अडवून जाब विचारला होता. त्यानंतर नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील नांदेडमध्ये मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. दरम्यान काँग्रेस पक्षाच्या विभागीय बैठकीत मराठा आंदोलकांनी घुसून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला जाब विचारला होता आणि आज शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाला समोर जावं लागलं आहे. 

नांदेड (Nanded) उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे सोमेश्वर येथे विकास कामाच्या उद्घाटनासाठी आले होते. या कार्यक्रमावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना अडवून घेराव घालत जाब विचारला. मराठा आरक्षण, सगेसोयरे अमंबजावणीच काय झाले. तूम्ही सत्ताधारी आहात, वाशीमध्ये सरकारने समाजाला दिलेल्या आश्वासनाचे काय झाले; याबाबतर मराठा आंदोलकांनी विचारणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेत धडक; आंदोलनाचा इशारा

Vastu Tips Inauspicious Signs : हातातून ‘या’ 5 वस्तू खाली पडल्या तर मानलं जातं अशुभ; कुटुंबावर येऊ शकतं संकट?

BJP Maharashtra : भाजपचा मेगाप्लान! महाराष्ट्रात नव्या टीमची घोषणा, विरोधकांची धार बोथट करणार

Pune : पुण्यात तंत्रज्ञानाची नवी क्रांती! पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये १६ हायटेक प्रयोगशाळा सुरू

White Forest Cake Recipe: घरच्या घरी बनवा बेकरीसारखी चव स्वादिष्ट व्हाईट फॉरेस्ट केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT