Nanded Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Nanded Heavy Rain : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी; अनेक गावांना फटका, झाडावर अडकलेल्या एकाला रेस्क्यू करून वाचविले

Nanded News : मागील आठवड्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी निर्माण झालेली पूरस्थिती ओसरल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडपून काढले आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाने दाणादाण उडवली आहे. दरम्यान कालपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी नांदेड जिल्ह्यातील मोठ्या नद्यांना अजूनही पूरस्थिती कायम आहे. पुरात काही नागरिक देखील अडकल्याची माहिती समोर येत आहे. तर पुराच्या वेढ्यात झाडावर अडकलेल्या एकाला प्रशासनाकडून रेस्क्यू करून वाचविण्यात यश मिळाले आहे. 

नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी निर्माण झालेली पूरस्थिती ओसरल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून शेती पिकांचे देखील मोठ्या नुकसान झाले आहे. तर काही मार्ग देखील बंद झाले आहेत. 

एकाला रेस्क्यू करून काढले बाहेर 

जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीत अनेक नागरिक अडकून पडले आहेत. एसडीआरएफ, आर्मी आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने अद्यापही बचाव कार्य सुरू आहे. तर नांदेडच्या बिलोली तालुक्यातील अटकळी येथे पुराच्या पाण्यात झाडावर अडकलेल्या एका व्यक्तीला स्थानिक प्रशासनाने बचाव कार्य करून रेस्क्यू करत बाहेर सुखरूप काढण्यात आले आहे. 

खामगाव शहर व परिसरात मुसळधार पाऊस.
बुलढाणा : सायंकाळी खामगाव व परिसरात दीड तास मुसळधार पावसाने कहर केला. खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात नगरपरिषदेने अनेक महिन्यांपासून नाली खोदून ठेवली आहे. त्याचे काम अपूर्ण सोडून ठेकेदार फरार झाला. यामुळे मात्र पावसाचे पाणी थेट दुकानांमध्ये शिरले आहे. काही दुकानांमध्ये तर दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी शिरल्याने व्यावसायिकांचं लाखो रुपयांचे नुकसान झालं. यावेळी तात्काळ राष्ट्रवादीचे नेते दिलीप कुमार सानंदा यांनी पंप सेट बोलवून हे पाणी उपसून देण्यास मदत केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : पुणे हादरलं! शाळेतील मुलीला फिरण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवलं, ५० वर्षाच्या नराधमाने केले घाणेरडं कृत्य

India's Got Talentच्या मंचावर शहनाज गिलला आली सिद्धार्थ शुक्लाची आठवण, रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

Breakfast Tips: कमी वेळ अन् हेल्दी नाश्ता; सकाळच्या घाईगडबडीत बनवा 'हे' पदार्थ, पोट दीर्घकाळ भरलेले राहील

गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाकडून भाजपच्या आमदाराच्या हत्येची सुपारी; अंबादास दानवेंनी फोडला बॉम्ब

SCROLL FOR NEXT