Nanded Rain Saam tv
महाराष्ट्र

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाचा धुमाकूळ; शेतातील पिके उध्वस्त, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश

Nanded News : नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे अजूनही पिके पाण्याखाली असून सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद पिकांचे प्रचंड नुकसान. यात जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टर वर शेती पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: नांदेड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यात साडेसहा हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर अविरत पावसामुळे शेतातील पिके अजूनही पाण्यात असल्याने पूर्णतः खराब झाले आहेत. यामुळे शेतकर्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे आहे. 

राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे नुकसानीची झळ बसत आहे. तर नांदेड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून अविरत पाऊस पडत आहे. सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतांमध्ये तळ्याचे स्वरूप पाहण्यास मिळत असून सर्व पिके पाण्याखाली गेले आहेत. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना प्रशासनाकडून मात्र अजूनही पंचनामे करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथील हे आहेत शेतकरी साहेबराव दुधमल यांना साडेतीन एकर शेती आहे. दोन एकरमध्ये सोयाबीन आणि दीड एकरमध्ये ऊस आहे. दुधमल यांचे दोन एकर मधील सोयाबीन अजूनही पाण्यात आहे. त्यांच्या हाती आता हे सोयाबीन लागणार नाही. दुधमल यांच्याप्रमाणेच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची या पावसाने बेहाल केले आहेत. अजूनही या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे शेतकरी आता सरकारवर रोष व्यक्त करीत आहेत. 

पावसाने शेतात पाणी साचले पिकांचे नुकसान

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पळाशीसह परिसरात दोन- तीन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. यामुळे कपाशी, मका, भुईमूग पिकांना फटका बसला आहे. तर मका आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पैठण हादरलं! पंचनाम्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या धमकीने शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं|VIDEO

Gorakhpur Student Case : विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या गोतस्कराचा पोलिसांकडून एन्काऊंटर; दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Indira Ekadashi 2025: आज आहे इंदिरा एकादशी, रात्री करा हे 3 सोपे उपाय, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Shocking : हातात लोखंडी दांडके, अंगावर रेनकोट, मध्यरात्री वावर; अंबरनाथकरांमध्ये 2 तरुणांची दहशत

Honda Amaze Car : 'बोल्ड अँण्ड ब्लॅक ब्युटी'; स्मार्ट फीचर्स पण किंमत मात्र स्वस्त

SCROLL FOR NEXT