Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : नांदेडमध्ये अवैध गर्भपात करताना आरोग्य विभागाची धाड; डॉक्टरांसह महिलाही फरार

Nanded News : गर्भलिंग निदान व गर्भपात करण्यास कायद्याने गुन्हा आहे. यास बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्याचे प्रकार केले जात आहेत

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: गर्भलिंग निदान व गर्भपात करणे हा गुन्हा असताना देखील काही ठिकाणी अवैधपणे गर्भपात केले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यातून समोर आला आहे. आरोग्य विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे.

गर्भलिंग निदान व गर्भपात करण्यास कायद्याने गुन्हा आहे. यास बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्याचे प्रकार केले जात आहेत. अशाच प्रकारे (Nanded) नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधपणे गर्भपात केला जात होता. याबाबत आरोग्य विभागाला माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने (Health Department) छापा मारुन कारवाई केली आहे. यावेळी दोन महिलांवर अवैध गर्भपात केला जात असल्याचे समोर आले. पण अंधाराचा फायदा घेत डॉक्टरांसह दोन महिलाही फरार झाल्याचे उघडकीस आले. 

डॉक्टरांवर गुन्हा दाखल 

पत्राच्या शेडमध्ये हा सर्व प्रकार सुरू होता. आरोग्य अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आरोपी बोगस डॉक्टर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली असून डॉक्टर आणि दोन्ही महिलांचा तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT