Nanded Accident News Saamtv
महाराष्ट्र

Nanded Accident News: मुलाला भेटायला जाताना भीषण अपघात; नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे निधन

Pune- Solapur Highway Accident: कोल्हेबोरगाव गावचे सरपंच ते कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तब्बल 12 वर्ष सभापती राहिले.

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, प्रतिनिधी...

Nanded News: नांदेडमधून एक दुर्देवी बातमी समोर आली आहे. नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार (Babarao Ambadrao) यांचे अपघाती निधन झाले आहे.पुणे सोलापूर महामार्गावरील माळवत चिखली या गावाजवळ शनिवारी रात्री 11 वाजता हा अपघात झाला. ज्यामध्ये बाबाराव एंबडराव यांचे दुर्देवी निधन झाले. या घटनेने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नांदेड (Nanded) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे अपघाती निधन झाले आहे.पुणे सोलापूर महामार्गावरील माळवत चिखली गावाजवळ हा भीषण अपघात (Accident) झाल्याचे सांगण्यात येत आहे. महामार्गावर उभा असलेल्या ट्रकवर एंबडवार यांची कार धडकली. या अपघातात ऍंबडवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर त्यांचा चालक करीमखान पठाण आणि रामचंद्र मोरे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूर येथे शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बाबाराव एंबडवार हे आपल्या मुलाला भेटण्यासाठी पुणे येथे जात होते. रस्त्यात त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या अपघाती निधनाने बिलोली तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

कोण होते बाबाराव एंबडवार?

नांदेडच्या बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव या गावचे ते रहिवाशी होते. कोल्हेबोरगाव या गावचे सरपंच ते कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तब्बल 12 वर्ष सभापती ते राहिले. बिलोली पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे दोन वेळा उपाध्यक्ष, आणि 5 वेळा आरळी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येऊन शिवसेनेकडून नांदेड जिल्हा परिषदेचे दोन वेळा अध्यक्ष पद बाबाराव एंबडवार यांनी भूषविले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शहापूर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

SCROLL FOR NEXT