Farmer Success Story Saam tv
महाराष्ट्र

Farmer Success Story : आयुर्वेदिक वन औषधी पिक लागवडीतून लाखो रुपयांची कमाई; नांदेडच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Nanded News : अकरा एकर शेतीमध्ये विविध प्रकारच्या आयुर्वेदिक वनौषधी पिकांची लागवड केली आहे. बालाजी महादवाड यांनी मागील वर्षांपासून या पीक लागवडीचा यशवी प्रयोग केला आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: पारंपरिक शेती करण्याऐवजी शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास शेती किती फायदेशीर असते; याचं उदाहरण नांदेडच्या एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. पारंपरिक पद्धतीने पिकांची लागवड न करता आयुर्वेदीक वन औषधीसाठी उपयुक्त असलेल्या पिकांची लागवड करण्याचा जुगार शेतकऱ्याने खेळला. या प्रयोग यशस्वी झाला असून शेतकऱ्याला यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. 

नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील बालाजी महादवाड या शेतकऱ्याने हा प्रयोग यशस्वी केला आहे. या शेतकऱ्याने आपल्या अकरा एकर शेतीमध्ये विविध प्रकारच्या आयुर्वेदिक वनौषधी पिकांची लागवड केली आहे. बालाजी महादवाड यांनी मागील वर्षांपासून या पीक लागवडीचा यशवी प्रयोग केला आहे. अकरा एकरमध्ये अमेरिकन चिया, अश्वगंधा, इटालियन तुळस, कलवंजी इसमगोल्ड, अजवाइन अशा प्रकारच्या सहा वनौषधी पिकांची लागवड करण्यात आली आहे. 

खर्च जाऊन २५ लाखांचा नफा 

पिकांच्या लागवडीसाठी महादवाड यांना ३० हजार रुपय खर्च आला. सध्या हे पीक काढणीला आले असून या पिकाच्या माध्यमातून खर्च वागळता २५ लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याचे महादवाड या शेतकऱ्याने सांगितले. पारंपरिक शेतीला बगल देत शेतीत नवनवीन प्रयोग करत पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. 

अन्य शेतकऱ्यांनीही टाकले पाऊल 

त्यांच्या या यशवी प्रयोगाकडे पाहून अनेकांना प्रोत्साहन मिळाले आहे. यातूनच डोंगरगाव येथील अनेक शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक वनौषधी पिकांची लागवड केली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक वनौषधी पिकांची लागवड करून आपली आर्थिक उन्नती करावी असे आवाहन बालाजी महादवाड या शेतकऱ्याने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT