Pratap Chikhalikar Ashok Chavan Saamtv
महाराष्ट्र

Nanded News: 'मजबुरीने कोणी येत असेल तर स्वागत...' अशोक चव्हाणांच्या बॅनरवरुन प्रताप चिखलीकरांचा टोला

Nanded News: नांदेडमधील राम मंदिरात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्या बॅनरवरुन जोरदार टीका केली.

Gangappa Pujari

संजय सूर्यवंशी, नांदेड|ता. २२ जानेवारी २०२४

Maharashtra Politics:

काँग्रेस पक्षाने श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले असले तरी नांदेडमध्ये मात्र काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाने या सोहळ्याचे बॅनर झळकले होते. या बॅनरनंतर राजकीय वर्तुळात अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अशातच आता अशोक चव्हाण यांच्या या बॅनरबाजीवरुन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

आज अयोध्येत प्रभु श्री राम यांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा पार पडत आहे. त्या निमित्तानं देशभर उत्सहाच वातावरण आहे. देशात सर्वत्र दिवाळी साजरी केली जात आहे. नांदेडमधील राम मंदिरात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना चिखलीकर यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या बॅनरवरुन जोरदार टीका केली.

काय म्हणाले प्रताप चिखलीकर?

"मजबुरीने कोणी आमचं घ्या म्हणून येत असेल तर त्यांचे स्वागत आहे. हीच बुद्धी परमेश्वराने त्यांना आधीच दिली असती तर आणखी आनंद झाला असता. राम काही एकाचे नाहीत ते सर्वांचे आहेत. लोकांनी शिव्या दिल्यावर रामाचा जयघोष करणं आणि स्वयंफुर्तींन करणे यात फरक आहे, असा टोला प्रताप चिखलीकर (Pratap Chikhalikar) यांनी लगावला.

भाजपमध्ये येण्यासाठी अनेक जण उत्सुक..

तसेच 'भाजपात येण्यासाठी अनेकजन लाइन लाऊन आहेत. असे लोक आले काय आणि नाही आले काय काही फरक पडत नाही असं म्हणत अशोक चव्हाण यांना खा चिखलीकरांनी टोला लगावला. ज्यांना रामाचं नाव घ्यायला लाज वाटते त्यांनी भाजपात येऊ नये असेही खासदार चिखलीकर म्हणाले. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT