Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

Nanded News : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लहान तांडा येथे आज सकाळी दोन घराला अचानक आग लागली.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लहान तांडा येथे आज सकाळच्या सुमारास दोन घराला आणि गोठ्याला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत आठ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अन्नधान्य आणि संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. 

नांदेडच्या (Nanded News) अर्धापूर तालुक्यातील लहान तांडा येथे आज सकाळी दोन घराला अचानक आग लागली. आगीने अचानक रौद्र रूप धारण करत जवळ असलेल्या गोठ्याला आग लागली होती. कैलास राठोड आणि ललिताबाई आडे असे या आगीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे नाव आहे. घरांना अचानक आग लागल्याने गावात एकच धावपळ सुरु झाली. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग नियंत्रणात आली नाही. यामुळे दोन्ही घरांसह गोठा पूर्णपणे जळून खाक झाला होता. 

लाखोंचे नुकसान 

आग आटोक्यात न आल्याने गोठ्यात बांधलेल्या आठ शेळ्यांचा आगीमुळे होरपळून मृत्यू झाला. तसेच घरात असलेले अन्नधान्य आणि संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. तसेच शेतीतील अवजारे देखील जळून खाक झाल्याने यात दोन (farmer) शेतकऱ्यांचे लाखो रुपये नुकसान झाले आहे. सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने दोन्ही शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA : म्हाडाचं घर विकता येतं का? जाणून घ्या घराचे नियम

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, पूस नदीला पूर

दहीहंडीच्या सणाच्या दिवशीच काळानं घात केला, शाळेला सुट्टी असल्यानं दोघे पोहायला गेले, पण..., कुटुंबाचा आक्रोश

Ajanta Caves History: महाराष्ट्रातील अजिंठा वेरुळ लेणीचा लेणी वास्तुकलेचा इतिहास माहिती आहे का?

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नवं कार्ड?

SCROLL FOR NEXT