Amit Shah on Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Amit Shah on Uddhav Thackeray: 'फडणवीस मुख्यमंत्री होतील, उद्धव ठाकरे यांनी केलं होतं मान्य', अमित शाह यांचा गौप्यस्फोट

''फडणवीस मुख्यमंत्री होतील, उद्धव ठाकरे यांनी केलं होतं मान्य', अमित शाह यांचा गौप्यस्फोट

Satish Kengar

Amit Shah on Uddhav Thackeray: ''मी पक्ष अध्यक्ष असताना, मी आणि देवेंद्र फडणवीस जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी (मातोश्रीवर) गेलो होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं होतं की, बहुमत एनडीएला मिळालं तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होती'', असं केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले आहेत. नांदेड येथे सभेला संबोधित करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

अमित शाह म्हणाले की, ''निकाल लागल्यानंतर एनडीए जिंकली. तेव्हा त्यांनी दिलेलं वाचन मोडलं. सत्तेसाठी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले.''

'तीन तलाकवर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी'

उद्धव ठाकरे यांना आव्हान देत अमित शाह म्हणाले की, ''मला उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की, तीन तलाक हटवलं, त्याशी तुम्ही सहमत आहेत की नाही. हिम्मत असेल तर तुमची भूमिका स्पष्ट करा.  (Latest Marathi News)

अमित शाह म्हणाले, ''मुस्लिम आरक्षण हे संविधानाला धरुन नाही. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम आरक्षण जायला पाहिजे की नाही? हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावं.'' ते म्हणाले, ''कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार इतिहासाच्या पुस्तकातून वीर सावरकरांचे धडे काढून टाकत आहे. याला तुमचं समर्थन आहे का? दगा देण्याचं, धोका देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे.''

तत्पूर्वी अमित शाह म्हणाले की, ''देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. ते परदेशात गेले तर कुणी ऑटोग्राफ मागतंय, कुणी पाय धरतंय तर कुणी बॉस म्हणतंय. मोदींचा करिष्मा जगभर पसरला आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT