Nanded News Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : शेतात कामाला गेलेले ३५ जण अडकले पुरात; जेसीबीच्या सहाय्याने काढले बाहेर

शेतात कामाला गेलेले ३५ जण अडकले पुरात; जेसीबीच्या सहाय्याने काढले बाहेर

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : महिना– दीड महिन्‍यापासून प्रतिक्षा असलेल्‍या पावसाने जोरदार हजेरी लावली. नांदेडच्या (Nanded) मुखेड तालुक्यातील पाळा येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) गावालगतच्या नाल्याला पूर आला होता. या पुरामुळे नाल्‍याच्‍या पलिकडे अडकलेल्‍या शेतकऱ्यांना जेसीबीच्‍या सहाय्याने आणण्यात आले. (Latest Marathi News)

नांदेड जिल्‍ह्यातील अनेक भागात बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे लहान नाल्‍यांना पुर आला होता. तर गावातही काही दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले झाल्याची माहिती आहे. दरम्‍यान दिवसभर मोकळे वातावरण असल्‍याने शेतकरी शेतात कामासाठी गेले होते. परंतु, अचानक आलेल्‍या पावसामुळे नाल्‍यांना पाणी आल्‍याने ३० ते ३५ शेतकरी अडकून पडले होते.

जेसीबीच्‍या सहाय्याने काढले सुखरूप

या पुरामुळे शेतात कामाला गेलेले ३० ते ३५ शेतकरी नाल्याला आलेल्या पुरामुळे नाल्या पलीकडे अडकून पडले होते. पुर आल्याने या शेतकऱ्यांना गावात येता येत नव्हते. अखेर जेसीबीच्या सहाय्याने रात्री नाल्यापलीकडील ३० ते ३५ शेतकऱ्यांना रात्री उशिरा सुखरुप गावाकडे आणण्यात आले. या घटनेकडे तहसिलदार राजेश जाधव हे विशेष लक्ष देऊन नागरीकांच्या संपर्कात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT