Nanded Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Accident: रिक्षासमोर अचानक वळू आला, अपघातामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Auto Rickshaw And Bull Accident In Nanded: नांदेडमध्ये रिक्षाच्या समोर अचानक वळू आल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा जागीच तर तिघे जखमी झाले आहेत.

Priya More

संजय सूर्यवंशी, नांदेड

नांदेडमध्ये ऑटो रिक्षाला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ऑटो रिक्षा आणि वळूच्या धडकेमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदेडच्या माहूर तालुक्यातील नखेगाव परिसरात अपघाताची ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा तपास नांदेड पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो आणि वळूच्या धडकेत दोन जण ठार तर तीन जखमी झालेत. नांदेडच्या माहूर - साखरणी महामार्गावरील नखेगाव परिसरात हा अपघात झाला. रात्री भरधाव असेलल्या प्रवाशी ऑटो समोर अचानकपणे वळू आला. त्यामुळे ऑटोने वळूला जोरदार धडक दिली. रिक्षा आणि वळूच्या धडकेमध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातात छत्रपती गवळी आणि रेखा जाधव या दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे खळबळ उडाली आहे.

गोंदियामध्ये देखील बैलामुळे अपघात झाला आहे. गोंदियात एसटीबस समोर बैल आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. या बसने ४ वाहनाला धडक दिली. गोंदियाच्या आयटीआय समोरील रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातामध्ये बैलाचा जागीच मृत्यू झाला तर बस चालकासह प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बस चालकाला रस्त्यावर बसलेला बैल न दिसल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT