Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : नांदेडमध्ये १२ घरफोडी; आरोपी पोलिसांच्या ताब्यात, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nanded News : नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे सत्र सुरु होते. घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही काळात घरफोड्यांचे (Nanded) सत्र सुरु होते. या भागात १२ घरफोडी झाल्याच्या घटना घडल्यानंतर या चोरट्याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Live Marathi News)

नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे सत्र सुरु होते. घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी (Nanded Police) अटक केली. त्याच्याकडून २५ लाख ६५ हजरांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या महिन्यात शहरातील फरांदे नगरात घर फोडुन सोन्या चांदीच्या दागिन्यासह इतर साहीत्य चोरी गेले होते. भाग्यनगर पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील जवळपास दोनशे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेतला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चोरट्याने दिली कबुली 

आरोपीला ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता आरोपीने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, कॅमेरा, मोबाईल फोन, एलईडी टीव्ही यासह २५ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठीची रचना जैनांनी केली, मुंबईत जैन विद्यापीठ हवे - जैन मुनी

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

SCROLL FOR NEXT