खून झालेल्या सचिन थोरात चा फोटो  SaamTvNews
महाराष्ट्र

आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन एकाचा खून!

नांदेडच्या वसंतराव नाईक कॉलेज समोरील घटना

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एका तरुणाचा चाकुने भोसकून खून (Murder) करण्यात आला आहे. तर, चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झालाय. ही धक्कादायक घटना काल रात्री उशिरा नांदेड शहरातील वसंतराव नाईक काॅलेजच्या (Vasantrao Naik College Nanded) समोर घडलीय. सचिन थोरात असं खुन झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर सुमेध वाघमारे असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हे देखील पहा :

आरोपी किशोर ठाकूर आणि आदिल शेख हे दोघे मिरवणूकीत नाचून अडथळा निर्माण करत असल्याने सचिन आणि सुमेधने त्यांना मिरवणुकीत नाचण्यास विरोध केला. हा राग मनात धरुन किशोर ठाकूर आणि आदिल शेख याने सचिन आणि सुमेधवर चाकूने हल्ला केला आणि फरार झाले.

चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांनाही उपचारासाठी नांदेड (Nanded) जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सचिनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, सुमेधवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी किशोर ठाकूर आणि आदिल शेख विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही आरोपी फरार असून पोलिस (Police) या दोन्ही आरोपीचा शोध घेत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fort : किल्ला, समुद्र अन् हजारो फ्लेमिंगो; मुंबईतील 'या' ठिकाणाचं सौंदर्य मन मोहून टाकतं!

Diabetes Diet: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी ठरू शकते फायदेशीर; ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Maharashtra News Live Update: धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला

सत्ताधारी पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या; कार्यालयात जाताना सहा जणांच्या टोळीने घेरलं अन्...

विंचू आणि साप चावण्यात नेमका काय फरक? पावसाळ्यात या घटना का वाढतात, जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

SCROLL FOR NEXT