nanded saam tv
महाराष्ट्र

Nanded Muncipal Corporation : '18 दिवस झाले पगार नाही, आज दिला तर ठीक अन्यथा...'

खाजगी कंपनीकडून कामगारांना कुठल्याच सोई सुविधा पुरवल्या जात नाहींत असा आराेप कामगारांनी केला आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News : मासिक वेतनासाठी नांदेड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी आज (बुधवार) काम बंद आंदाेलन छेडले आहे. दरम्यान आजच्या आजच वेतन मिळाले नाही तर उद्यापासून बेमुदत काम बंद करणार असल्याचा इशाला गणेश शिंगे (अध्यक्ष, कामगार संघटना) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिला. (Maharashtra News)

अर्धा महीना उलटला तरी मासिक वेतन न मिळाल्याने नांदेड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी आज सकाळ पासून अचानक काम बंद केले. नांदेड शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीचे कंत्राट पालिकेने खाजगी कंपनीला दिले. मात्र कंपनीकडून कामगारांना कुठल्याच सोई सुविधा पुरवल्या जात नाहीं.

वेळेवर वेतन दिलं जात नाहीं. दर महिन्याच्या एक तारखेला वेतन देण्याचे मागच्या आंदोलनावेळी (aandolan) कंपनीने मान्य केलं होत. पण आज अठरा तारीख असताना वेतन मिळालं नाहीं असे कामगारांनी सांगितले.

कामगार संघटनेचे अध्यक्ष गणेश शिंगे म्हणाले पालिका प्रशासन चर्चा करायला तयार नाही. त्यामुळे आज कामबंद आंदाेलन केले आहे. आजच्या आज वेतन मिळालं नाही तर उद्या पासुन बेमुदत काम बंद करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT