nanded municipal corporation workers morcha, Nanded-Waghala Municipal Corporation  saam tv
महाराष्ट्र

Nanded Morcha News : पगार थकविल्याने कंत्राटी सफाई कामगारांचा नांदेड महापालिकेवर माेर्चा

महापालिका प्रशासन कामगारांशी चर्चा करायला तयार नाही असेही संघटनेच्या पदाधिका-यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News : मासिक वेतनासाठी नांदेड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी आज (गुरुवार) पुन्हा काम बंद आंदाेलन छेडले. त्यानंतर कर्मचा-यांनी महापालिका कार्यालयावर माेर्चा काढला. (Maharashtra News)

नांदेड शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीचे कंत्राट पालिकेने खाजगी कंपनीला दिले. मात्र कंपनीकडून कामगारांना कुठल्याच सोई सुविधा पुरवल्या जात नाहीं. तसेच अर्धा महीना उलटला तरी मासिक वेतन न मिळाल्याने नांदेड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी बुधवारी अचानक काम बंद केले.

दर महिन्याच्या एक तारखेला वेतन देण्याचे मागच्या आंदोलनावेळी कंपनीने मान्य केले होते. परंतु कामगारांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने घर कसे चालवायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला.

त्यातच पालिका प्रशासन देखील आमच्याशी चर्चा करायला तयार नाही असा कामगारांनी आरोप करत बुधवारी काम आंदाेलन छेडले. आज कामगारांनी महापालिका कार्यालयावर माेर्चा काढला.

साम टीव्हीशी बाेलताना कामगार संघटनेचे अध्यक्ष गणेश शिंगे म्हणाले पालिका प्रशासन चर्चा करायला तयार नाही. त्यामुळे आज माेर्चा काढावा लागला. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदाेलन छेडले जाईल असा इशारा देखील कामगार संघटनेने दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होताच महिलांची नवीन शक्कल; 'या' योजनांसाठी सुरू झाली अर्जांची लाट

Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा मोठा प्लॅन, 4,500 बसेस धावणार; दररोज 33 लाख भाविक करणार प्रवास

Veen Doghantali Hi Tutena Video : चोराच्या उलट्या बोंबा! अंशुमन चिंगीवरच करतो घाणेरडे आरोप; स्वानंदी सत्य कसं समोर आणणार?

Monsoon Update : पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सून धडकणार, राज्यात मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT