Collapsed section of the Nanded-Latur highway bridge highlights serious concerns over construction quality and safety standards. saam tv
महाराष्ट्र

18 महिन्यांत नांदेडचा पूल जमीनदोस्त, खोकेबाज अधिकारी, धोकेबाज कंत्राटदार, कंत्राटदाराच्या निर्लज्ज मॅनेजरचं भूकंपावर खापर

Nanded Bridge Collapse: अवघ्या 18 महिन्यात नांदेड- लातूर महामार्गावरील पूल जमीनदोस्त झालाय... खोकेबाज अधिकारी आणि धोकेबाज कंत्राटदारांनी नागरिकांच्या टॅक्सचा पैसा निकृष्ट दर्जाच्या कामात कसा पाण्यात घातलाय..पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

राज्यात मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाजवळ दरड कोसळण्यावरून आधीच वाद पेटलेला असताना आता नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा एक मोठा भाग अचानक कोसळल्याने खळबळबळ उडालीय.. कोट्यवधी रुपये खर्च करून अवघ्या दीड वर्षापूर्वी बांधलेला हा पूल पत्त्यासारखा कोसळल्यानं महायुती सरकारच्या गतिमान विकासाच्या दाव्यांची लक्तरे वेशीवर टांगली गेलीयत...

निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे हा पूल यापूर्वीच कोसळला असता असा धक्कादायक आरोप प्रत्यक्षदर्शीनं केलाय... या दुर्घटनेवेळी काही दुचाकीस्वार आणि विद्यार्थी थोडक्यात बचावलेत...मात्र प्रोजेक्ट मॅनेजरनं निकृष्ट दर्जाचा मुद्दा फेटाळून लावत थेट भूकंपामुळे पूल पडल्याचा अजब दावा केलाय.. दरम्यान काँग्रेसनं पूलाच्या निकृष्ट बांधकामावर बोट ठेवत थेट महाराष्ट्रातील अधिकारी आणि कंत्राटदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत...तर या घटनेची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केलीय,....

सरकारकडून वारंवार दर्जेदार रस्ते आणि महामार्गांचे जाळं विणल्याचा दावा केला जातो... मात्र अवघ्या दोन महिन्यात मिसिंग लिंकवरील रस्त्यांवर खड्डे पडणं आणि दीड वर्षात थेट राष्ट्रीय महामार्गाचा पूल कोसळणं यावरून जनतेच्या पैशांची अधिकारी आणि कंत्राटदारांकडून कशी लूट केलीय जातेय... याचाच पर्दाफाश झालाय. निकृष्ट दर्जाचं काम करूण घेणारे अधिकारी आणि भूकंपावर खापर फोडणारऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे क्लीन चिट मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : भयानक! १९ वर्षांच्या पत्नीला हेल्मेटनं ठेचून मारलं, लग्नानंतर ४ महिन्यात नेमकं काय झालं?

शिंदेसेनेनंतर भाजप नगरसेवकाची गुंडगिरी, महाडच्या मुख्याधिकाऱ्यांना छत्रीनं मारहाण, अटकेचा फार्स आणि कायद्याचे धिंडवडे

Shahi Tukda Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा

Maharashtra News Live Update: खेडमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार; तिघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Sanju Samson : भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान संजू सॅमसनचा मोठा निर्णय; अचानक स्पर्धेतून नाव घेतलं मागे; सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT