Nanded bd Three people Death News  Saam TV
महाराष्ट्र

Nanded News : भयंकर घटना! एका विडीने अख्खं कुटुंब संपवलं; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

देगलूर तालुक्यातील बल्लूर या गावात ही भयंकर घटना घडली आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. विडी ओढून झाल्यावर ती घरातील फेकणं तीन जणांच्या जीवावर बेतलं आहे. पेटलेली बिडी घरात ठेवलेल्या फवारणी पंपावर पडली आणि भीषण स्फोट (Accident) झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. देगलूर तालुक्यातील बल्लूर या गावात ही भयंकर घटना घडली आहे. (Nanded Latest News)

सूर्यकांत माधवराव सक्रप्पा (वय ५२ वर्षे), गुबाई सूर्यकांत सक्रप्पा (वय ५० वर्षे) आणि मुलगा कपिल सूर्यकांत सक्रप्पा (वय २० वर्षे) अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, सूर्यकांत सक्रप्पा हे आपल्या पत्नी आणि मुलासह बल्लूर गावात वास्तव्यास होते. तर शेतीची कामे सुरु असल्याने पिकांवर फवारणी करण्यासाठी त्यांनी फवारणी टॅंक आणली होती. त्यासाठी त्यात पेट्रोल सुद्धा भरून ठेवले होते.

दरम्यान, ७ ऑगस्ट रोजी सूर्यकांत सक्रप्पा हे आपल्या पत्नी आणि मुलासह नेहमीप्रमाणे गप्पा मारत घरात बसले होते. गप्पा मारता-मारता त्यांनी विडी पेटवली. पेटवलेली विडी ओढून झाल्यानंतर त्यांनी घरातील कोपऱ्यात फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र ती घरात ठेवलेल्या फवारणी पंपावर पडली. (Nanded Todays News)

टॅंकमध्ये पेट्रोल असल्याने जोराचा भडका झाला. पाहता-पाहता मोठा स्फोट झाला आणि सूर्यकांत यांच्यासह पत्नी गुबाई आणि मुलगा कपिल यांच्यावर आगीचा भडका जाऊन पडला. यामध्ये तिघेही गंभीर भाजले गेले. देगलूरच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना विष्णुपुरी नांदेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतांना अखेर तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT