NANDED FARMERS PROTEST saam tv
महाराष्ट्र

सावकारांची फायनान्स दुकानं लोकांनी फोडली; नांदेडमध्ये क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक

Farmers' Organisation Vandalises Bajaj Finance: राज्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांची मुजोरी वाढत चाललीये. अशातच आता शेतकरी संघटनांचा संयम सुटताना दिसतोय. नांदेडमध्ये शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत कार्यालयाची तोडफोड केलीये. त्यामुळे कंपन्यांची ही वसुली सहनशक्तीच्या पलीकडे जातोय का?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

राज्यातल्या मायक्रो फायनान्स कंपन्यांची वाढत्या वसुलीखोरीविरोधात शेतकऱी कमालीचे आक्रमक झाले आहेत. नांदेडमध्ये हप्तेवसुलीच्या तगाद्यानं हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं थेट फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयाला धडक दिली. यावेळी या संतप्त आंदोलकांनी बजाज फायनान्स आणि श्रीराम फायनान्स कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. एव्हंढच नव्हे तर नांदेडमधला हा प्रकार हा फक्त ट्रेलर असल्याचं सांगत संघटनेनं फायनान्स कंपन्यांना इशारा दिलाय..

खरंतर, ग्रामीण भागात विविध ठिकाणी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून हप्तेवसुलीसाठी छळ करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललीये. एव्हंढच नव्हे तर शेतात पीकं उद्ध्वस्त झाल्यानं आणि हाताला काम नसल्यानं कंपन्यांचे हप्ते भरण्यासाठी शेतकऱ्यांना घरं विकण्याची वेळ आलीये. तर याच नांदेडमध्ये कंपन्यांच्या सावकारी जाचाला कंटाळून एका शेतकऱ्यानं थेट फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच जीवन संपवलं.

म्हणूनच की काय आता कंपन्यांच्या मुजोरीला रोखण्यासाठी शेतकरी संघटनांनी कायदा हातात घेतल्याचं दिसतंय. कारण कंपन्यांची वसुलीखोरी शेतकऱ्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याचं दिसतंय. त्यामुळे यावर सरकारनं योग्य तोडगा काढण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाचा असाच उद्रेक होत राहणार.

दरम्यान कंपनीने याप्रकरणाची दखल घेत शेतकऱ्यांना आवश्यक ते मदत करण्यास कंपनी तत्पर असल्याचं म्हटलंय. लोहा येथील शाखेत झालेली तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या धमक्यांबद्दल बजाज फायनान्सने चिंता व्यक्त केलीय. कंपनीशी संबंध नसलेल्या मुद्द्यांवरून शाखेची तोडफोड करणे, कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि कामकाज बंद पाडणे योग्य नाही, असं मत बजाज फायनान्स च्या प्रवक्त्याने व्यक्त केलं आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील ग्राहकांना महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांनुसार आणि लागू असलेल्या नियमांचे पालन करून कंपनीकडून सहकार्य केले जात आहे. या कठीण काळात ग्राहकांना शक्य ती सर्व मदत देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: लग्नसमारंभ आणि सणांसाठी ट्राय करा महेश्वरी साडीचे ७ सुंदर आणि रॉयल डिझाइन्स!

Jalna: ३८ हजार रुपये दे नाहीत तर मर, वसुली एजंटकडून बळीराजाचा छळ; संतापजनक ऑडिओ क्लिप व्हायरल

पुण्यात पर्वतीवर कार्तिक स्वामी उत्सवास प्रारंभ; दर्शनाची नेमकी वेळ कोणती? मोरपिसे वाहण्यास बंदी का? जाणून घ्या सर्व माहिती

तुमचाही फोन टॅप होतोय? दुर्लक्ष करू नका! या 5 संकेतांमधून लगेच ओळखा

Maharashtra News Live Update: ‘धंगेकरांना अल्झायमर झाला आहे, त्यांच्या लक्षात राहत नाही’; पुष्कर तुळजापूरकरांची टीका

SCROLL FOR NEXT