Nanded farmer dies amid crop failure and mounting agricultural debt saam tv
महाराष्ट्र

'एकाही कर्जमाफीच्या योजनेत माझं नाव नाही'; दुष्काळ परिस्थितीला कंटाळून शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

Nanded Farmer Killed Himself: नांदेड तालुक्यातील बोरगाव येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केलीय. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सरकारला प्रश्न विचारलेत. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.

Bharat Jadhav

  • पावसाच्या दीर्घ खंडामुळे शेतातील पिकांचे नुकसान

  • पीककर्जाचा भार आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे आर्थिक संकट

  • कर्जमाफी योजनेत आपले नाव नसल्याची खंत

संजय सुर्यवंशी, साम प्रतिनिधी

पावसाच्या दीर्घ खंडामुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं. त्यामुळे डोक्यावर पीककर्ज आणि मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा डोंगर उभा राहिला. या दुष्टचक्रात सापडलेल्या एका बळीराजाने अखेर हतबल होऊन मृत्यूला कवटाळलं. नांदेड तालुक्यातील बोरगाव येथे ही दुखद घटना घडलीय. सरकारनं शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली, आर्थिक मदतही जाहीर केली. परंतु गरजू शेतकऱ्यांपर्यंत मात्र ही मदत मिळत नसल्यानं बळीराजा हताश झालाय.

नाव नोंदवूनही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्यां डोक्यावरील कर्जाचा भार कसा कमी करावा असा प्रश्न अनेकांना समोर उभा राहिलाय. त्यात निसर्गानं केलेल्या दगाफटक्यामुळे उत्पन्नही मिळणार नाहीये. अशाच संकटात सापडलेल्या नांदेडमधील अल्पभूधारक शेतकऱ्यानं जीवन संपवलंय.

शंकर आबानराव क्षीरसागर (वय ४६) असं आत्महत्या करणाऱ्या येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचं नाव आहे. शंकर आबानराव क्षीरसागर यांनी शेतात गळफास लावून आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ पोस्ट करत शासन-प्रशासनाच्या धोरणांवर अत्यंत तिखट शब्दांत संताप व्यक्त केला होता.

व्हिडिओमध्ये काय म्हणाले शंकर क्षीरसागर?

व्हिडिओत आपण पाहू शकतो की, शंकर क्षीरसागर हे रडताना दिसत आहेत. रडत रडत ते म्हणाले की,

'कलेक्टर साहेब, मी विनंती करतो. कर्जमाफी झालीच पाहिजे. एकाही कर्जमाफीच्या योजनेत माझे नाव आले नाही. त्यामुळे मी आज आत्महत्या करतोय. शासन म्हणते विद्यार्थ्यांचे शुल्क माफ झाले. पण कुठे माफ झाले सांगा बरं? माझी मुलगी मेडिकलला शिकतेय, फी माफीसाठी अर्ज करूनही ती झाली नाही. तुम्ही आमची विनंती गांभीर्याने घेऊन चौकशी करा'.

मृत शंकर क्षीरसागर हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनचे पीक घेतले होते, परंतु यंदा पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे पीक पूर्णपणे वाया गेले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. क्षीरसागर यांना दोन मुली आणि एक मुलगा, असा परिवार आहे. त्यांची एक मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. शासनाकडून विद्यार्थ्यांची फी माफ झाल्याच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्ष अर्जांनंतरही मुलीची फी माफ झाली नव्हती.

शेतातील नुकसान आणि मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या फीचा ताण यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. सोमवारी दुपारी क्षीरसागर शेतात गेले. तेथे त्यांनी मोबाईलवर स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ पाहताच नातेवाईक आणि पोलिसांनी तातडीने त्यांचा शोध सुरू केला. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच त्यांनी शेतात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली होती. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT