सातबाऱ्यावर ५ भावांचं नाव असेन तर पीएम किसान योजनेचा पैसा कोणाला मिळेल?

Bharat Jadhav

पीएम किसान सन्मान निधी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते.

प्रत्येकांना सहा रुपये मिळतील

अनेक कुटुंबांमध्ये एकाच जमिनीच्या नोंदीवर सातबाऱ्यावर दोन, चार किंवा पाच भावांची नावे असतात. मग सर्व भावांना प्रत्येकी ६,००० रुपयांचा लाभ स्वतंत्रपणे मिळेल का? अनेकांची नावे नोंदवलेली असतील तरी प्रत्येकाला पीएम किसानचा लाभ मिळत नाही.

पीएम किसानचा पैसा कोणाला मिळेल?

संबंधित व्यक्ती स्वतंत्र शेतकरी म्हणून पात्र ठरते का, याची पडताळणी सरकारकडून केली जाते. जर जमिनीतील त्यांचे प्रत्येकी हिस्सा स्पष्टपणे नोंदवलेला असेल आणि ते आपापल्या भागावर प्रत्यक्ष शेती करत असतील, तर त्यांना स्वतंत्र लाभ मिळण्याची शक्यता असते.

पीएम किसान योजनेचा नियम

या योजनेत पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले यांना एकाच कुटुंबाचा घटक मानले जाते, कुटुंबातील सदस्यांना योजनेचा लाभ स्वतंत्रपणे मिळत नाही. मात्र, सज्ञान भावांच्या बाबतीत नियम वेगळे असू शकतात. जर ते स्वतंत्रपणे राहत असतील. सरकारी नोंदींमध्ये स्वतंत्र शेतकरी म्हणून त्यांची नोंद असेल तर लाभ मिळेल.

पीएम किसानचा हप्ता या गोष्टींमुळे रखडतो

पीएम-किसान (PM-Kisan) योजनेचा लाभ घेण्यासाठी, शेतकऱ्यांनी आपली नोंदणी आणि ई-केवायसी (e-KYC) अद्ययावत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच, जमिनीच्या नोंदींमधील त्रुटी वेळेवर दुरुस्त करून घेणेही गरजेचे आहे.

शेतीवरील नाव नोंदणीची माहिती घ्या

जर एकाच जमिनीच्या नोंदीवर अनेक भावांची नावे असतील, तर जमिनीतील त्यांचा विशिष्ट हिस्सा, महसुली नोंदी, कौटुंबिक स्थिती आणि पीएम-किसान नोंदणी यांबाबतची माहिती सर्वप्रथम पडताळून पाहिली पाहिजे. जेणेकरून योजनेचा लाभ मिळेल.

Pm Kisan: Who Gets The Money If Five Brothers Are Named On One 7/12 Extract?

हेही वाचा

येथे क्लिक करा

Agricultural Loan: १ बिघा शेतजमीन असेल तर किती कर्ज मिळू शकते?