Farmer Sugarcane Loss  AI PHOTO
महाराष्ट्र

Farmer Sugarcane Loss : रिल्स बनवण्याच्या नादात शेतकऱ्याच्या कष्टाची राख, फटाक्यांमुळे लाखोंचा ऊस जळाला | VIDEO

Nanded Farmer : सोशल मीडियावर रिल्स बनवण्याच्या नादात शेतकऱ्याच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे. नांदेडच्या मरळक येथे फटाके फोडल्यामुळे तब्बल ३ एकर ऊस जळून खाक झाला असून, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

साम टिव्ही ब्युरो

फटाक्यांमुळे लाखोंच्या उसाची राख

रिलस्टार्सच्या हुल्लडबाजीचा शेतकऱ्याला फटका

नांदेडमध्ये ऐन दुष्काळात शेतीचं नुकसान

साम टीव्ही प्रतिनिधी - संजय सुर्यवंशी

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सध्या तरुणाईमध्ये रिल्स बनवण्याची क्रेझ वाढताना दिसत आहे. मात्र, काही सेकंदांच्या व्हिडीओसाठी केली जाणारी ही हुल्लडबाजी आता इतरांसाठी मोठे संकट ठरत आहे. दिवाळीच्या फटाक्यांसोबत रिल्स बनवण्याच्या नादात शेतकऱ्याच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे. रिलस्टारमुळे शेतकऱ्याचा लाखोंच्या ऊसाची राख झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात शेतकरी संकटात सापडला आहे.

फटाक्यांमुळे लाखोंच्या उसाची राख

सोशल मीडियावर रिल्स बनवण्याची क्रेझ सध्या तरुणाईच्या चांगलीच डोक्यात शिरली आहे. मात्र, हीच हौस आता अन्नदात्यासाठी जीवघेणी ठरली आहे. नांदेड तालुक्यातील (Nanded Farmer) मरळक येथे रिल्स काढण्यासाठी फोडलेल्या फटाक्यांमुळे कापणीला आलेला तब्बल 3 एकरावरील ऊस जळून खाक झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंब उघड्यावर आले असून, हुल्लडबाज रिल्स स्टार्सवर कडक कारवाईची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.

मराठवाडा आधीच दुष्काळात होरपळून निघालाय. त्यात काही शेतकऱ्यांनी जीवाचं रान करून आपली शेती जगवली आहे. मात्र बेजबाबदारपणे फटाके फोडणाऱ्यांची हुल्लडबाजी बळीराजाच्या पिकांवर उठलीय आणि त्यातूनच या लाखोंच्या ऊसाची राख झालीय. सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी आणि काही सेकंदांच्या रिल्ससाठी लोकांच्या जीवाशी आणि शेतकर्‍यांच्या कष्टाशी खेळणाऱ्या या विकृतीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Transfer : पोलीस दलात मोठे फेरबदल! ३ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुठे केली नियुक्ती ? जाणून घ्या

Mumbai Local Crime : मुंबई लोकलमध्ये संतापजनक घटना! तरुणीचा विनयभंग करून ट्रेनखाली ढकललं | VIDEO

Maharashtra News Live Update: मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथक संशयाच्या भोवऱ्यात

मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर अपघात, भरधाव ट्रकची लक्झरी बसला धडक; ३० प्रवाशांनी भरलेली बस थेट पलटी, पुढे काय झालं?

Cheque Book Rule : व्यवहारासाठी CTS चेक बुक चालणार नाही, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT