Breaking : पक्षप्रवेशापुर्वीच साबणेंना भाजपची उमेदवारी; प्रदेशाध्यक्षांनी केले ट्विट! संतोष जोशी
महाराष्ट्र

Breaking : पक्षप्रवेशापुर्वीच साबणेंना भाजपची उमेदवारी; प्रदेशाध्यक्षांनी केले ट्विट!

शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपकडून पक्षप्रवेश करण्यापुर्वीच उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. या बाबतचं पत्र सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपकडून पक्षप्रवेश करण्यापुर्वीच उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. या बाबतचं पत्र सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भाजपाच्या केंद्रीय कार्यालयातून निघालेल्या या पत्रात देशात होणाऱ्या मिझोरम, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करण्यात आहेत.

हे देखील पहा :

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे निश्चित झाले आहे. साबणेंंनी भाजपमध्ये उडी मारण्याची तयारी सहा महिन्यापूर्वीच केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालीय.

नांदेड मध्ये शिवसेनेचे साबणे यांच्या भाजप प्रवेशाने शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. मात्र, साबणेंंनी पक्षाकडे अद्याप राजीनामा पाठविला नाही आणि थेट अशोक चव्हाण यांच्या वर आरोप करत उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, पक्षप्रवेशापूर्वीच त्यांना उमेदवारी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत देगलूर मध्ये त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News : सातारा डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, पीडितेच्या हात आणि पत्रावरील हस्ताक्षर जुळत नाही? ठाकरे गटाचा मोठा दावा

'१ वाजता आली, चेहऱ्यावर चिंता अन्..' 'त्या' रात्री डॉक्टर तरूणीसोबत काय घडलं? हॉटेल मालकानं सर्वच सांगितलं

Badlapur Crime: साताऱ्यानंतर बदलापुरात खळबळ; डॉक्टर महिलेवर प्राणघातक हल्ला

Maharashtra Live News Update: महाडमध्ये रेल्वे यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमरण उपोषण

India vs Australia: ऐन रंगात आलेल्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय; वरुणराजाच्या गोंधळानं पहिल्या टी२० सामना रद्द

SCROLL FOR NEXT