Nanded Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nanded Crime: मेव्हणीच्या प्रियकराचा दाजीने काढला काटा; नांदेडमधील थरारक घटना, नेमकं काय घडलं?

Nanded News Today: नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Shivani Tichkule

संजय सूर्यवंशी

Crime in Nanded: नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेव्हणी सोबत असलेल्या प्रेम संबंधातून एका युवकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची घटना 17 जुलै रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील चौघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

इतवारा पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील किरण नामक युवकाचे याच भागातील एका युतीशी सुत जुळले होते. आपल्या मेहुणी सोबत असलेले त्याचे प्रेम संबंध यावरून किरण आणि शिवा यांच्यात अनेक वेळा वाद झाला होता. (Nanded Crime News)

वारंवार सांगूनही किरण यांचे प्रेम संपत नसल्याने अखेर मेहुणीच्या प्रियकराचाच काटा काढण्याचा कट शिवा आणि त्याच्या मित्रांनी रचला. 17 जुलै रात्री अकराच्या सुमारास शिवा, सुभाष आणि अन्य लोकांनी किरण याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.

यात किरणचा मृत्यू झाला. हत्येनंतर इतवारा पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा नांदेड (Nanded) शहरात खळबळ उडाली आहे. उर्वरित आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police : प्रमोशन रखडले, निवृत्ती जवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची फरफट; जाणून घ्या सविस्तर

BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

Shravan Somwar Shivamuth: श्रावणात पहिल्या सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाची कडक ॲक्शन; 'किंगडम'चा जबरी ट्रेलर, पाहा VIDEO

Needle-free injection Nagpur: सुई, सूज, वेदना यापैकी काहीच नाही! नागपुरात मिळतंय सुईशिवाय इंजेक्शन

SCROLL FOR NEXT