Bhokar PoliceStation Saamtv
महाराष्ट्र

Nanded Crime News: नांदेडमध्ये खळबळ! टीव्हीचा आवाज बंद न झाल्याने आला संशय; दरवाजा उघडताच दिसलं भयंकर

Nanded News Update: तरुणाच्या तोंडावर आणि शरीराच्या काही भागावर मारहाणीच्या जखमा आढळल्या आहेत.

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, प्रतिनिधी...

Nanded Bhokar News: नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील रिठ्ठा गावात एका २५ वर्षीय तरुणाचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा देखील आढळून आल्या आहेत. माधव सकीरगे असे या तरुणाचे नाव असून या प्रकरणी भोकर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. (Nanded News)

याबाबत अधिक माहिती अशी की, माधव सकीरगे हा मागील काही महिन्यांपासून रिठ्ठा गावात एकटा राहत होता. काही वर्षापूर्वी त्याच्या आई वडिलाचे निधन झाले आहे. गवंडी काम करुन तो स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. शनिवारी सायंकाळी तो कामावरून घरी परतला. रात्रभर त्याच्या घरातून टीव्हीचा आवाज येत होता.

मात्र हा आवाज सकाळपर्यंत बंद न झाल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यामुळेच शेजारी राहणारे काहीजण त्याच्या घरी गेले असताना त्यांना माधवचा मृतदेह आढळून आला. याबद्दल तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. (Latest Marathi News)

घटनेची माहिती मिळताच भोकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी मृत तरुणाच्या तोंडावर आणि शरीराच्या काही भागावर मारहाणीच्या जखमा पोलिसांना आढळून आल्या. त्यामुळेच या तरुणाचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करत भोकर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या धक्कादायक घटनेने गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Maharashtra News Live Update: पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

Urine Problem : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT