nanded congress district president b r kadam  saam tv
महाराष्ट्र

Nanded Congress : 'अशाेक चव्हाण भाजपमध्ये, जनता काॅंग्रेस साेबत'; नांदेडची धूरा हाती घेताच बी.आर कदम कडाडले

Nanded Latest Marathi News : आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नांदेड जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded :

अशोक चव्हाण (ashok chavan) यांच्या सोबत काही महत्वाचे लोक भाजपात गेले असले तरी जनता मात्र आजही आमच्या साेबत आहे. नांदेड काँग्रेस आजही मजबूत असल्याचे नांदेड जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम यांनी नमूद केले. कदम यांच्या निवडीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नांदेडची काॅंग्रेस भक्कम असल्याचे नमूद केले. (Maharashtra News)

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. यामुळे नांदेड जिल्ह्याची काँग्रेसची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha election 2024) पार्श्वभूमीवर काँग्रेसने नांदेड जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीसाठी हालचाली केल्या.

काँग्रेसने जेष्ठ नेते नेते बी.आर. कदम यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. कदम यांनी जिल्हाध्यक्षपदाची धूरा हातात घेताच लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचाच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात नुकसान होणार नाही. काही महत्वाचे लोक अशोक चव्हाण यांच्या सोबत भाजपात गेले आहेत. परंतु नांदेडची जनता मात्र आजही काँग्रेस पक्षा सोबत आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांमध्ये काॅंग्रेसचे उमेदवारच विजयी हाेणार असेही कदम यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT