Nanded BJP  Saam tv
महाराष्ट्र

Nanded BJP : नांदेडमध्ये भाजपला पुन्हा धक्का; माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर यांचा राजीनामा

Nanded News : नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत असताना एकामागून एक दोन धक्के भाजपला बसले आहेत.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड जिल्ह्यात भाजपला खिंडार पडले आहे. माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता नांदेडमध्ये भाजपाला दुसरा धक्का बसला आहे. डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर यांनी भाजपला रामराम केला आहे.

नांदेड (Nanded) जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत असताना एकामागून एक दोन धक्के भाजपला बसले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या तथा माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपशी सोडचिठ्ठी केली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. यानंतर नांदेडमध्ये भाजपाला दुसरा धक्का बसला असून माधवराव पाटील किन्हाळकर यांनी (BJP) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे  भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पडले आहे. 

दहा वर्षांपूर्वी माधवराव पाटील किन्हाळकर यांनी (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु किन्हाळकर यांना मागील दहा वर्षात भाजपने कुठलीही जवाबदारी दिली नाही. त्यामुळे ते भाजपात नाराज होते. माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांच्या नंतर त्यांनी देखील भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज किन्हाळकर यांनी भाजपला राम राम ठोकला आहे. आता ते पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीचे महत्त्वाची बैठक पार पडली

Pollution Alarm: पुणेकरांच्या फुफ्फुसात विषारी धूळ; हवेत दर तासाला मिसळलं जातंय 6 टन सिमेंट

EPFO चा ऐतिहासिक निर्णय; आता UPI द्वारे पीएफ काढता येणार?

husband wife clash : पतीचा फोन हिसकवाल तर जेलमध्ये जाल? तक्रार केल्यास 3 वर्षांची शिक्षा, दंडही लागणार?

Maharashtra Politics: काँग्रेस-हिंदुत्ववादी रस्त्यावर भिडले; काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला,राजकारणाचा कल्ला

SCROLL FOR NEXT