Nanded Accident Saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident : ट्रकची बैलगाडीला धडक; शेतकऱ्यासह बैलगाडी कोसळली नदीत, बैलाचा मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

Nanded News : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची धडक लागल्याने बैलगाडीसह शेतकरी नागन्ना पोतन्ना कोतुलगाव हे पुलावरून थेट खाली पाण्यात बैलगाडीसह कोसळले. या घटनेत एका बैलाचा जागीच मृत्यू झाला

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: रस्त्याने जात असलेल्या बैलगाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत शेतकरी आपल्या बैलगाडीसह पुलावरून थेट नदीत कोसळला. या अपघातात एक बैल जागीच ठार झाला; तर घटनेत शेतकरी थोडक्यात बचावला आहे. सदरचा अपघात नांदेडच्या किनवट तालुक्यातील आप्पारापेठ या ठिकाणी घडला आहे. 

नांदेडच्या किनवट तालुक्यातील आप्पारापेठ ते गोंडजेवली नाक्याकडे जाणाऱ्या रोडवरील श्रीधर रेड्डी यांच्या शेताजवळील अरुंद पुलावर ही घटना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी किनवट तालुक्यातील आप्पारापेठ येथील नागन्ना कोतुलगाव (वय ४८) हा शेतकरी वैयक्तिक खाजगी कामासाठी बैलगाडीने छोटे गोटे शेताकडे नेण्यासाठी निघाले होते. याच दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचा बैलगाडीला जोराचा धक्का लागला. 

धडकेत बैलगाडी पुलावरून कोसळली 

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची धडक लागल्याने बैलगाडीसह शेतकरी नागन्ना पोतन्ना कोतुलगाव हे पुलावरून थेट खाली पाण्यात बैलगाडीसह कोसळले. या घटनेत एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. तर शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. त्यांनी दुसऱ्या बैलाचा दोर कापून बैलाला पाण्यातून बाहेर काढले. यामुळे एक बैल बचावला आहे.   

शेतकरी जखमी 

बैलगाडी पुलावरून खाली कोसळली. यात नदीत पाणी असल्याने शेतकरी पुलाच्या पाण्यातून कसा बसा बाहेर निघाला. तर नागन्ना कोतुळगाव हा अपंग शेतकरी या गंभीर घटनेतून बालबाल बचावला आहे. मात्र अपघातात एका बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

SCROLL FOR NEXT