Nanded Accident Saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident : वऱ्हाडाच्या गाडीला अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो झाला पलटी, १५ वऱ्हाडी जखमी

Nanded News : टेम्पो पलटी होऊन झालेल्या या अपघातात ४ जण अतिगंभीर तर ११ जण किरकोळ जखमी झाले आहेत

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: लग्न सोहळ्यासाठी जात असलेल्या वऱ्हाड्यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना नांदेड ते देगलूर महामार्गावर घडली. (Nanded) चालकाचे नियंत्रण सुटल्याने वऱ्हाड्यांनी भरलेला टेम्पो पलटी होऊन यात १५ वर्हाडी जखमी झाले आहेत. 

पुढील एक महिना लग्नाच्या तारखा नसल्याने आज शेवटची तारीख आहे. या मुहूर्तावर असलेल्या लग्न सोहळ्यासाठी जाणाऱ्या वऱ्हाडींच्या गाडीला अपघात झाला. नांदेड- देगलूर महामार्गावरील किन्हाळा गावाजवळ लग्नाला जाणाऱ्या टेम्पोचा अपघात (Accident) झाला. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वैजापूर पारडी येथील वऱ्हाडी देगलूर तालुक्यातील शहापूर या गावी लग्नासाठी (Marriage) जात होते. बिलोली तालुक्यातील किन्हाळा या गावाजवळ या टेम्पोला अपघात झाला. टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यालगत पलटी झाला. रस्त्यालगत असलेल्या एका खड्यात या टेम्पोत असलेले वऱ्हाडी जाऊन पडले. 

चौघांची प्रकृती चिंताजनक 

टेम्पो पलटी होऊन झालेल्या या अपघातात ४ जण अतिगंभीर तर ११ जण किरकोळ जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी लागलीच मदतीसाठी धाव घेतली. यानंतर अपघातातील जखमींना स्थानिकांनी जवळच्या नायगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT