Accident News, satara,  saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident News: भरधाव दुचाकी आणि कारचा भीषण अपघात; थरारक घटनेत काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या मुलाचा जागीच मृत्यू

Accident News: स्वातंत्र्य दिना निमित्त मित्रांनी मोटार सायकल रैली काढली होती. या रैलीत रोहित देखील शामिल झाला होता.

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

Nanded News: नांदेडमधून अपघाताची एक थरारक घटना समोर आली आहे. भरधाव वेगातील दुचाकी कारवर अदळल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक महिती अशी की,नांदेड शहरालगत असलेल्या हसापूर बायपासवरील मामा चौक परिसरात ही घटना घडली आहे. सदर घटनेत रोहित मुदिराज असं मयत तरुणाचे नाव आहे. स्वातंत्र्य दिना निमित्त मित्रांनी मोटार सायकल रॅली काढली होती. या रॅलीत रोहित देखील शामिल झाला होता.

रोहित हा भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता. यावेळी समोरून येणाऱ्या कारला दुचाकी धडकली. दुचाकी जास्त वेगात असल्याने धडकेत रोहित उंच हवेत फेकला गेला. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. या भीषण अपघातात कारचा आणि दुचाकीच्या काही भागाचा चुराडा झालाय. मयत रोहित मुदिराज हा काँग्रेस पदाधिकारी व्यकंट मुदिराज यांचा मुलगा होता. अपघाच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद

सातारा पुणे मार्गावर खंबाटकी घाटाजवळ असणाऱ्या बोगद्यात चालत्या ट्रकवर लाईटचा अँगल पडून अपघात झाला आहे. अपघातात ट्रक चालक जखमी झालाय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बोगद्यातून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद करून सकाळपासून वाहतूक जुन्या रस्त्याने म्हणजेच खंबाटकी घाटामधून पुण्याकडे वळवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २० हजार कोटींची मदत जमा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती|VIDEO

Maharashtra Live News Update: दिल्ली स्फोट करणारे भारत देशाच्या बाहेरचे होते की भारत देशाच्या आत मधील होते

Real cause of breast pain: स्तनात जाणवणाऱ्या वेदनांचं खरं कारण काय? डॉक्टरांनी सांगितला महिलांसाठी महत्त्वाचा इशारा

Shocking News : डोंबिवलीत हत्येचा थरार! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या, पोलिसांनी काही तासात आवळल्या हल्लेखोरांच्या मुसक्या

Pawna Lake Tourism: बजेट कमी आहे? 'या' ठिकाणी करा ट्रीप, कुल्लू मनाली विसराल

SCROLL FOR NEXT