मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कलावंतांचे सर्व प्रश्न मार्गी लावू- नाना पटोले Saam Tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कलावंतांचे सर्व प्रश्न मार्गी लावू- नाना पटोले

प्रसिध्द गायक विष्णू शिंदे यांच्या नेतृत्वात नाना पटोले यांनी लोक कलावंतांची बैठक मुंबई येथे बोलावली होती या सर्व लोक कलावंताना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन नाना पटोलेंनी दिले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज प्रसिध्द गायक विष्णू शिंदे यांच्या नेतृत्वात नाना पटोले यांनी लोक कलावंतांची बैठक मुंबई येथे बोलावली होती. यावेळी सर्व लोक कलावंत मंडळीना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन नाना पटोले यांनी दिले आहे.Nana Patole's promise to solve the problems of all folk artists

हे देखील पहा-

मागील दोन वर्षांपासून कोरोनाCorona pandamic महामारीमुळे लादल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळेLockdown सर्वच क्षेत्रातील लोकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक नुकसान झालं ते 'हातावरती पोट असणाऱ्या वर्गाचे' लॉकडाऊन मुळे या वर्गाच्या हाताला कामच नसल्यामुळे हे लोक आजही अनेक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत. या वर्गामध्ये आपल्या राज्याला परंपरेने लाभलेले लोककलावंतFolk artist मोठ्या प्रमाणावरती आहेत. यामध्ये तमाशा, पोवाडे गाणारे, वाजंत्री मग त्यामध्ये ढोलकी वाजविणाऱ्या असे अनेक कलावंत आहेत. या कलावंत या कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत trouble आले आहेत. तसेच या कलावंताना मदतHelp मिळावी म्हणून सरकार दरबारी विनंती करुनही यावरती काहीही कृती झाली नाही.

याच प्रार्श्वभूमीवर या लोक कलावंतांचा आवाज सरकार दरबारी मांडण्याची जबाबदारी काँग्रेस Congress State President प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्विकारली असं म्हणायला हरकत नाही.

नाना पटोले यांनी बोलवलेल्या या बैठकीमध्ये लोक कलावंताकडून सरकारकडे प्रमुख मागण्या करण्यात आल्या सर्व कलावंताना ताबडतोब 25 हजारांची मदत करा, सांस्कृतिक खात्याकडून 'अ' वर्गाच्या कलावंताना 15 हजार रुपये 'ब' वर्गाच्या कलावंताना 10 हजार रुपये तर 'क' वर्गाच्या कलावंताना 5 हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

तसेच हि मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे लावून धरा अशी विनंतीसुद्धा कलावंतांनी नाना पटोलेंजवळ केली. तसेच रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत ध्वनिक्षेपकSpeaker लावण्याची परवानगी मिळावी अशीही मागणीही यावेळी करण्यात आली. या सर्व मागण्या पुर्ण करण्यासाठी परिपुर्ण प्रयत्न करेन असं आश्वासन नाना पटोलेंनी यावेळी उपस्थित लोककलावंतांना केले.

दरम्यान या बैठकीस माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, गायक विश्वजित शिंदे, प्रकाश सोनावणे, मोहन जोशी, आणि इतर लोककलावंत उपस्थित होते.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विजयाच्या उंबरठ्यावर

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

SCROLL FOR NEXT