Nana Patole  Saam TV
महाराष्ट्र

'हे सरकार लवकर पडेल म्हणून...'; नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

जे. पी. नड्डा यांच्या जे पोटात होतं ते ओठात आलं - पटोले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : राज्यातील शिंदे सरकार हे लवकर पडेल म्हणून कमी काळात किती कामे केली हे दाखवण्यासाठी आम्ही केलेल्या कामांना स्थगिती देण्याचं काम सुरु केलं असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्तगिती देण्याचा धडाका लावला आहे.

याच पार्श्वभूमिवर पत्रकारांनी नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'दोन वर्षांपूर्वी ठरलेले निर्णय कोणत्या आधारावर रद्द करतात कळत नाही. शिवाय हे सरकार लवकर पडेल म्हणून कमी काळात किती कामे केली हे दाखवण्यासाठी हा सर्व प्रकार सुरु असल्याची टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

पाहा व्हिडीओ -

नड्डांच्या पोटातलं ओठात आलं -

तसंच हुकूमशाही पद्धतीने वागण्याचं काम सुरु आहे. जे. पी. नड्डा (J P Nadda) यांच्या जे पोटात होतं ते ओठात आलं. इंग्रज ज्या पद्धतीने वागायचे त्या पद्धतीने हे वागतात. त्यांना सत्तेचा गर्व आहे. गर्वहरण होणं गरजेचं आहे. राऊतांच्या कारवाईबाबात प्रश्न विचारला असता पटोले म्हणाले, अत्याचारी वागण्याला कोणी घाबरायचं नाही.

यावेळी त्यांनी अस्लम शेख आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीवर भाष्य केलं, शेख हे मच्छिमारांच्या हितासाठी त्यांना भेटले होते. मोहित कंबोज यांचा वाढदिवस होता. ते दोघे आजूबाजूला राहतात. म्हणून सोबत गेले असल्याचं त्यांनी सांगितलं.

जर तरचा माफीनामा मान्य नाही -

दरम्यान, राज्यपालांनी मागितलेली माफी म्हणजे जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न आहे. राज्यपालांनी कशी माफी मागितली पाहा. जर चूक झाली असेल तर माफी मागते म्हटलं आहे. मी चूकलो असेन तर माफी असं राज्यपालांचं वक्तव्य म्हणजे जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न आहे. जर आणि तरचा माफीनामा मान्य नाही असं पटोले म्हणाले.

गुजरातचा फायदा कसा होईल या दिशेने ईडी वागतेय ते बरोबर नाही असंही पटोले यावेळी म्हणाले. काँग्रेसची थोड्याच वेळात बैठक बैठकीत राहूल गांधी, सोनिया गांधीसह सर्व बड्या नेत्यांचा सहभाग भाजपाविरोधात रणनिती आखण्यासाठी बैठक बोलवली असल्याची माहिती देखील पटोले यांनी यावेळी दिली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: प्रकाश निकम यांची शिंदे गटातून हकालपट्टी

Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? अमित शहांच्या वक्तव्यानंतर भाजपमधून आली पहिली प्रतिक्रिया

IND vs AUS: BGT आधी टीम इंडियाचा तळ्यात मळ्यात कारभार! 2 प्रश्नांनी वाढवलंय टेन्शन

Singham Again : 'सिंघम अगेन'च्या कमाईत मोठी घट; सात दिवसांचं कलेक्शन किती झालं? वाचा

Nana Patole on Badlapur Case : बदलापूरच्या 'त्या' शाळेत ब्लू फिल्म बनवायचे; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT