Nana Patole saam tv
महाराष्ट्र

Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वादावर नाना पटोले बॅकफूटवर; स्वत:घेतला मोठा निर्णय

नाना पटोले यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

Ruchika Jadhav

Nana Patole News : थोरात यांनी ना राजीनामा दिला ना पत्र दिलं. बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्याबरोबर बसून चर्चा करू, चर्चा करून जो वाद आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करू अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. त्यांच्या या वक्तव्याने नाना पटोले यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. (Latest Nana Patole News)

सरकारनामा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी योग्य तो मार्ग काढून वाद मिटवण्याचं म्हटलं आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. यात सत्यजीत तांबे यांनी देखील काँग्रेस नेतृत्वावर टीकास्त्र सोडलं. तसेच बाळासाहेब थोरातांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा दिला.

या सर्वांत काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला. हा वाद मिटवण्यासाठी नाना पटोलेंनी पुढाकार घेतला आहे. 'बाळासाहेब थोरातांच्या पत्राची कॉपी मला दाखवा. पत्र किंवा राजीनामा लिहिलेलं कोणतंही पत्र मला दाखवा. कोणत्याही वृत्तपत्राने किंवा चॅनेलने ते पत्र दाखवलेलं नाही. म्हणजेच त्यांनी पत्र दिलेलं नाही,असं नाना पटोले यांनी म्हंटलं आहे.

बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिलेला नाही. त्यांचा राजीनामा हा बोलण्यापूरता आहे. असे असले तरी आता हा वाद मिटला आहे. परंतू माध्यमं हा वाद शांत होऊ देत नाहीत. ते वाद वाढवत आहेत. याबाबात आमची चर्चा सुरू आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT