प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न करणार- नाना पटोले  Saam Tv
महाराष्ट्र

प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न करणार- नाना पटोले

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे.

सुरेंद्र रामटेके

वर्धा: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे. काँग्रेसने आज या बाबत अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली आहे. विरोधी पक्षाशी चर्चा करून प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

प्रज्ञा सातव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. राजीव सातव हे काँग्रेसचे युवक नेते होते त्यांचा सर्वांशी जवळचा परिचय होता. यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न करणार आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षाशी चर्चा करणार असल्याचं नाना पटोले म्हणाले. ते वर्धेच्या सेवाग्राम येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे उपस्थित होते.

काँग्रेस नेते राजीव सातव यांचं निधन झाले होते, त्यांनंतर राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांचं नाव चर्चेत होतं परंतु त्यावेळी रजनी पाटील यांना उमेद्वारी दिली आणि त्या निवडून आल्या. त्यावेळीही भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. यावेळीही भाजपला विनंती करुन विधान परिषदेचीही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पटोले म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT