Nana Patole राजेश काटकर
महाराष्ट्र

केंद्राच्या आडमुठ्या धोरणामुळे राज्य अंधारात जाण्याची भीती; नाना पटोलेंची टीका

भाजपचे पहाटेचे सरकार पडल्यापासून भाजपवाले आम्ही झेंडा फडकविणार असे दिवास्वप्न बघत असतात. त्यांना आता चैनच पडत नाही. हे सरकार पडणार हे सरकार पडणार अशा घोषणा करीत असतात.

राजेश काटकर

परभणी - राज्यात कोळसा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राच्या आडमुठ्या धोरणामुळे राज्य अंधारात जाण्याची भीती आहे,अस होऊ नये म्हणून आमचे मंत्री केंद्राच्या संपर्कात आहेत. यापूर्वी एकवेळ असा प्रकार घडला होता. पण अस पुन्हा होऊ नये यासाठी राज्य सरकार काळजी घेत असल्याची माहिती काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी परभणीत (Parbhani) दिली. ते यावेळी येलदरी येथे एका खाजगी कार्यक्रमाला आले होते यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला.

भाजपचे पहाटेचे सरकार पडल्यापासून भाजपवाले आम्ही झेंडा फडकविणार असे दिवास्वप्न बघत असतात. त्यांना आता चैनच पडत नाही. हे सरकार पडणार हे सरकार पडणार अशा घोषणा करीत असतात. ईडी सीबीआय सारख्या एजन्सीच्या दुरुपयोग करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं. आरोप केलेली लोक दुधाने अंघोळ करून भाजपमध्ये गेल्यावर शुद्ध झालीत. आता नव्याने आरोप करून देखील सरकार हलत नसल्याने हे परेषाण आहेत. त्यामुळं आपलं सरकार पडणार नाही याच समर्थन करावं लागत आहे असं म्हणत नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपाला जोरदार उत्तर दिले.

हे देखील पहा -

निवडणुकीच्या काळात पेट्रोल डिझेलच्या किंमती का वाढल्या नाहीत याच उत्तर केंद्राने द्यावं,लोकांची मत घ्यायची आणि मत घेतल्यांनातर लोकांचे खिसे कापायची ही पद्धत योग्य नाही असा घाणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केला. परभणीत इंधन महाग असण्याचे कारण केंद्र सरकारची लूट आहे,मराठवाड्यात इंधन डेपो उभारावा अशी आम्ही मागणी करू ,जर आम्हाला केंद्रात सत्ता मिळाली तर मराठवाड्यात आम्हीच इंधन डेपो उभारू अस आश्वासन नाना पटोले यांनी परभणीकरांना दिले.

नाना पटोलें यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही असा आरोप विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. त्यावर उत्तर देतांना नाना पटोले म्हणाले आम्हाला भाजपच्या प्रमाणपत्राची गरज नाही. दुसऱ्याची लायकी काढण्यापेक्षा ज्यासाठी यांना केंद्रात सत्ता दिली,ते काम यांनी नीट करायला हवं होतं, पण यांनी सर्वसामान्य लोकांना महागाईच्या खाईत लोटले आहे. केंद्रातील सरकार गरिबांना बरबाद करायला निघालय, यावर भाजपवाले कधी का बोलत नाहीत,लोकशाहीमध्ये जनतेच्या प्रमाणपत्राची गरज आहे,यांच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही,जनतेच्या प्रश्नासाठी कटिबद्ध आहोत अस नाना पटोले यांनी प्रवीण दरेकरांच्या प्रश्नाला उत्तर देतांना म्हणाले.

सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांना उद्देशून आगलावे म्हणत टीका केली,याबद्दल नाना पटोले यांना विचारलं असता भाजपला सत्तेची गुर्मी आली आहे. ते कुणाला काहीही म्हणू शकतात, त्यांना इतर प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं असत त्यामुळे टिंगल टवाळी करण्यापलीकडे काही येत नाही,भाजप आता फेल झाली आहे असा घाणाघात भाजपवर केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT