Nalasopara News Saam tv
महाराष्ट्र

Nalasopara News : धक्कादायक..खासगी शिकवणीतील शिक्षिकेची मुलीला बेदम मारहाण; दहा वर्षीय मुलीची मृत्यूशी झुंज

Nalasopara News : नालासोपारा परिसरात हि घटना घडली आहे. यात दहा वर्षीय विद्यार्थिनी हि खासगी शिकवणीसाठी रत्ना सिंग यांच्या जात असते

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे

नालासोपारा : खासगी शिकवणी लावलेल्या क्लासमधील शिक्षिकेने दहा वर्षीय विद्यार्थिनीला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीच्या कानाखाली मारल्याने मुलगी गंभीर झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक आहे. 

नालासोपारा (Nalasopara News) परिसरात हि घटना घडली आहे. यात दहा वर्षीय विद्यार्थिनी हि खासगी शिकवणीसाठी रत्ना सिंग यांच्या जात असते. दरम्यान कलासमध्ये क्षुल्लक कारणांवरून खासगी शिकवणी घेणार्‍या रत्ना सिंग या शिक्षिकेने मुलीच्या कानाखाली जोरदार चापट मारली. यामुळे कानात असलेली बाही मानेत घुसल्याने मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखम दुरुस्त होत नसल्याने मुलीच्या आई- वडिलांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

दरम्यान या मारहाणीत मुलीच्या श्वसनलिकेसह मेंदूला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर मुंबईच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मागील ८ दिवसांपासून ती कृत्रिमश्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटवर) मृत्यूशी झुंज देत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सदर प्रकाराबाबत मुलीच्या आई- वडिलांनी तुळींज (Police) पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच पोलिसांनी रत्ना सिंग याना नोटीस बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT