Nalasopara News Saam tv
महाराष्ट्र

Nalasopara News: दुर्दैवी घटना.. डिश अँटेना सरळ करताना गेला तोल; गच्चीवरून पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

Nalasopara News दुर्दैवी घटना.. डिश अँटेना सरळ करताना गेला तोल; गच्चीवरून पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

चेतन इंगळे

नालासोपारा : टीव्हीचा डिश अँटेना सरळ करण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा तोल जाऊन खाली पडून मृत्यू झाला आहे. (Nalasopara) नालासोपारा पूर्वेच्या मोरे गावमधील शिवमनगर येथे गुरुवारी दुपारी ही दुर्घटना घडली. आदर्श मिश्रा असे या दुर्घटनेत मरण (Death) पावलेल्या मुलाचे नाव आहे. (Latest Marathi News)

नालासोपारा पूर्वेच्या मोरे गावमधील शिवमनगर येथे साई सृष्टी हाईट्स ही ८ मजली इमारत आहे. या इमारतीच्या ५ व्या मजल्यावर मिश्रा कुटूंबिय राहतात. मिश्रा दांपत्य उत्तरप्रदेश येथील गावी गेले होते. त्यांची आदर्श मिश्रा आणि आरती मिश्रा ही दोन्ही मुले घरी एकटीच रहात होती. गुरुवारी दुपारी दोन्ही भाऊ बहीण घरात टीव्ही बघत होते. टीव्हीचे प्रक्षेपण नीट दिसत नसल्याने आदर्श डिश अँटेना सरळ करण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेला. तेथे डिश अँटेना सरळ करत असताना तोल जाऊन तो गच्चीतून खाली पडला. त्याला उपचारासाठी पालिकेच्या तुळींज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आदर्श हा याच परिसरातील सेंट अँथॉनी शाळेत ९ व्या इयत्तेत शिकत होता. शाळेत तो हुशार मुलगा म्हणून ओळखला जात होता. टीव्हीचा डिश अँटेना सरळ करण्यासाठी तो यापूर्वी अनेकदा गच्चीवर जायचा; अशी माहिती शेजरच्यांनी दिली. त्याच्या या दुर्दैवी मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT