नायगाव नगर पंचायत निवडणुक; भाजपच्या दोन उमेदवारांचा काँग्रेसला पाठिंबा Saam TV
महाराष्ट्र

नायगाव नगर पंचायत निवडणुक; भाजपच्या दोन उमेदवारांचा काँग्रेसला पाठिंबा

भाजपचे आमदार राजेश पवार यांना राजकिय धक्का बसल्याने भाजपाच्या गटात अस्वस्थता पसरली आहे.

संतोष जोशी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील नायगाव नगर पंचायत निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी चालु असून उमेदवारी माघारी घेण्याचा आजच्या शेवटच्या दिवसी भाजपाच्या दोघांनी आपली उमेदवारी माघारी घेतल्याने काँग्रेसच्या दोन जागा बिनविरोध आल्या आहेत. अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी परत घेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपच्या गटात प्रचंड खळबळ उडाली आहे, तर काँग्रेस गटात मोठ्या उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या दोघांसह बारा इतर अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी परत घेतल्याने निवडणुकीच्या बारा प्रभागासाठी ३१ उमेदवार रिंगणात आहेत.

भाजपचे आमदार राजेश पवार यांना राजकिय धक्का बसल्याने भाजपाच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. सोमवारी उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसी प्रभाग क्र.३ मधिल उमेदवार आकांक्षा प्रकाश कुर्हाडे आणि प्रभाग क्र ९ मधील रबिनाबी सय्यद बाबूसाब या दोन्ही भाजपाच्या उमेदवारांनी काँग्रेस पक्षाचे नेते नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपकडून भरलेली उमेदवारी माघारी घेत काँग्रेसला पाठींबा जाहीर केला.

सोमवार प्रभाग ३ व ९ मधील उमेदवारांनी आपली उमेदवारी माघारी घेतल्याने गिता जाधव आणि सुमनबाई सोनकाबंळे हे दोन काँग्रेस चे महिला उमेदवार बिनविरोध निवडून आले आसल्याने काँग्रेस गटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे तर दुसरी कडे भाजपा च्या गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Rain : उल्हास नदीला पूर; पुलावरून पाणी वाहत असल्याने महामार्ग वाहतुकीस बंद

Maharashtra Rain Live News : लोकसभेत घटनादुरूस्ती विधेयक मांडले, विरोधकांचा गोंधळ

Highest egg consumption: कोणत्या देशात सर्वाधिक अंडी खाल्ली जातात?

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कल्याणमध्ये खिंडार, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

Basundi Recipe: सणासुदीला घरी बनवा गोड बासुंदी; सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT