Nashik News Saam TV
महाराष्ट्र

Nashik News: वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये अग्नितांडव; जिंदाल कंपनीला भीषण आग

नाशिकच्या जिंदाला कंपनीला भीषण आग लागली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nashik News: नाशिकमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. नाशिकच्या जिंदाला कंपनीला भीषण आग लागली आहे. यात अनेक व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थशळी पोहचली असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार बॉयलरचा स्पोट झाल्याने कंपनीला आग लागली आहे. सदर घटनेची जी दृश्य समोर आली आहेत त्यात अग्नितांडव पाहायला मिळत आहे. हवेत आगीचे लोट दूरपर्यंत पसरल्याचे दिसत आहे. अजूनही ही आग शांत करण्याचे काम सुरू आहे. तसेच आतमध्ये कंपनीचे अनेक कर्मचारी अडकले असल्याची माहिती मिळाली आहे.

घडलेल्या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा शासकीय रुग्णालयात एमर्जेंसीचे ३० पेक्षा अधिक बेड तयार करण्यात आलेत. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय, एसएमबीटी , वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय सज्ज असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचे एक पथक, स्ट्रेचर, वार्ड बॉय देखील तयार केले आहे. जिल्हा रुग्णालय वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सज्ज असल्याची माहिती शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी दिली आहे.

नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे या गावाजवळ जिंदाल कंपनीचा प्लांट आहे. कंपनीत स्पोट झाला तेव्हा त्याची भीषणता इतकी होती की, आसपासच्या २० ते २५ गावांना मोठा आवाज ऐकू आला. कंपनीत साधारणता २००० कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इगतपुरीला रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना नाशिकच्या सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात आता पर्यंत ९ ते १० जखमींना सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

SCROLL FOR NEXT