Massive Explosion at Ammunition Factory In Nagpur  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: नागपूर पुन्हा हादरले! दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, दोघांचा मृत्यू

Massive Explosion at Ammunition Factory In Nagpur: नागपूरमध्ये दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीमध्ये दुपारी २ वाजताच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरला. या स्फोटात दोघांचा मृत्यू झालाय.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील डोरलीगावाजवळ असलेल्या एका दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही कामगार कंपनीत काम करत होते तर काही कामगार बाहेर होते त्याचवेळी हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूरमध्ये दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीत दुपारी दोनच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटाने आजूबाजूचा परिसर हादरला. लांबपर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आला. या स्फोटामध्ये कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती समोर आली नाही.

या स्फोटामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. पोलिस सध्या या स्फोटाचा तपास करत आहेत. मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी कंपनीबाहेर मोठी गर्दी केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे देखील स्फोट झालेल्या डोरली येथे दाखल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT