नागपूर ते अमरावती मेट्रो सुरू करणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Saam Tv News
महाराष्ट्र

नागपूर ते अमरावती मेट्रो सुरू करणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर ते अमरावती मेट्रो सुरु करुन ते अंतर १ तास २५ मिनिटांमध्ये कापले जाणार त्यामुळे जलद गतीने प्रवास करता येणार आहे.

अरुण जोशी

अमरावती: विदर्भाच्या विकासाला गती देण्यासाठी व ग्रामीण भागही मेट्रो सिटी करण्याची महत्त्वाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावतीत केली. नागपूर ते अमरावती मेट्रो सुरु करुन ते अंतर १ तास २५ मिनिटांमध्ये कापले जाणार त्यामुळे जलद गतीने प्रवास करता येणार आहे. (Nagpur to Amravati Metro to be launched - Union Minister Nitin Gadkari)

हे देखील पहा -

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले की, पुढील काळात मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरे जोडण्याचे नियोजन आहे. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. आठ डब्यांच्या या मेट्रोत अत्याधुनिक सेवा उपलब्ध असतील व त्यातील इकॉनॉमी श्रेणी डब्याचे प्रवास दर बस प्रवासाइतके माफक असतील.

या प्रकल्पासाठी उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. विदर्भात अनेक रस्त्यांच्या  कामांना मेट्रोच्या माध्यमातून चालना देण्यात आली आहे. अमरावतीत काल रात्री विविध विकास कामांच्या रस्त्याचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते पार पडले यावेळी त्यांनी महत्त्वाची घोषणा केली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Bhavan : मोठी बातमी! विधानभवानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Scalp Massage Tips: आठवड्यातून दोन वेळा करा 'स्काल्प मसाज', केसांची होईल भरभर वाढ

Maternity Leave : कोणताही नियम महिलेला मातृत्व रजा घेण्यापासून रोखू शकत नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Monalisa Wedding : मोनालिसानं फरमानसोबत पळून जाऊन केलं लग्न, कुंभमेळ्यामुळे रातोरात झाली होती प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT