महाराष्ट्र

'नीट'ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही; तरुणी विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

nagpur shocking : नागपुरात विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. 'नीट'ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नसल्याचे म्हणत तरुणीने आयुष्य संपवलं.

Vishal Gangurde

नागपुरात विद्यार्थिनीची आत्महत्या

नीट परीक्षा देण्याची हिंमत नसल्याचे म्हणत आयुष्य संपवलं

आत्महत्या करणारी विद्यार्थिनी मूळची मध्य प्रदेशातील आहे

पराग ढोबळे, साम टीव्ही

मध्य प्रदेशातील विद्यार्थिनीने नागपुरात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 'नीट'ची परीक्षा देण्याची हिंमत नाही, असं म्हणत विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं. विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने नागपुरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा चतुर्वेदी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तिने २० मे रोजी नागपुरात आत्महत्या केली. तिने आत्महत्या करण्याआधी लिहिलेली चिठ्ठी देखील समोर आली आहे. आकांक्षाने 'नीट'ची परीक्षा दिली होती. तिने पेपर चांगला गेल्याचे सांगितले होते. मात्र, पेपर फुटीमुळे संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली.

आकांक्षा चतुर्वेदी ही विद्यार्थिनी मूळची मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील मगनिया गावातील राहणारी होती. मुलीला शिकवण्यासाठी तिच्या वडिलांनी किसान क्रेडिट कार्ड वर 3 लाखांचे कर्ज घेतलं होतं. कुटुंब चालवण्यासाठी तिचे वडील नागपुरात काम करत होते. 20 मे रोजी नागपुरातील घरी कोणीही नसताना नैराश्यात गेलेल्या आकांक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आकांक्षाचा मृतदेह घेऊन कुटुंबीय मुळगाव मगनिया येथे पोहचले. त्यानंतर तिच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. आकांक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी कुटुंबियांना मिळाली आहे. त्यात नीट परीक्षेमुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

"मम्मी-पप्पा तुम्हाला विश्वास होता की तुमची मुलगी डॉक्टर बनणार आहे. मात्र आता पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिंमत नाही, असं आकांक्षाने आत्महत्या करण्याआधी इंग्रजीत लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये उल्लेख आहे. नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आकांक्षाच्या आत्महत्येने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाड MIDC तील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती, एका कामगाराचा मृत्यू

Monsoon skin itching: पावसाळ्यात त्वचेला खाज का येते?

Chanakya Niti: या 4 लोकांना तुमची कमाई आणि समस्या कधीही सांगू नका, चाणक्यांचा महत्त्वाचा सल्ला

Bhimashankar : विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ? भीमाशंकरमधील आश्रमशाळेत सापांचा सुळसुळाट, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Maharashtra Politics: काँग्रेसला हादरा! शिंदेसेनेच्या गळाला लागला मोठा मासा; शेकडो पदाधिकाऱ्यांसह 'धनुष्यबाण' घेणार हाती

SCROLL FOR NEXT