Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: २ महिन्यांपूर्वी लग्न, दिवाळीनिमित्त घरी आले; घरात आढळले शिक्षक दाम्पत्याचे मृतदेह

Nagpur News: नागपूरमध्ये शिक्षक दाम्पत्यानी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळून आले.

Priya More

नागपुरात कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलेल्या शिक्षक दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मनीष प्रल्हाद गणवीर आणि सोनाली मनीष गणवीर असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावं आहेत. दोघेही गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिक्षक दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे नागपुरात खळबळ उडाली.

बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेसा येथील रेवतीनगरमध्ये ते राहत होते. घराचा दरवाजा बंद करून ओढणीने गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केली. दिवाळीनिमित्त नातेवाईक घरी भेटण्यासाठी आले असता ही घटना उघडकीस आली. फॅनला लटकलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळून आले. दोघांनी टोकाचे पाऊल का उचलले? अद्याप कळू शकले नाही.

दोघेही अगोदरच घटस्फोटीत होते. गडचिरोलीतील सूरजागड येते ते शिक्षक होते. तिथेच दोघांची ओळख झाली. दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ३१ ऑगस्टला त्यांनी लग्न केले. लग्नानंतर ते नेहमी नागपूरला यायचे. दिवाळीनिमित्त घरी आले असता त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

मनीषचे कुटुंबीय बुद्धगया येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यामुळे घरात कुणीच नव्हते. मनीष आणि सोनाली दोघेही नागपूरला दिवाळीसाठी आले होते. त्यांच्यामध्ये दुपारी कडाक्याचे भांडण झाले. पण नंतर आवाज बंद झाला, अशी माहिती शेजारच्यांनी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे नातेवाईक घरी आले असता त्यांना मनीष आणि सोनाली गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

मनीष आणि सोनाली यांचे मृतदेह एकाच फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घरातील हॉलमध्ये पोलिसांनी दारूची बॉटल आणि दोन ग्लास आढळून आले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलगा आणि सून या दोघांनी आत्महत्या केल्यामुळे गणवीर कुटुंबीयांना दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळमधील २५ वर्षांची 'महाडिक सत्ता' संपली? यंदा त्या पॅटर्नला ब्रेक, अध्यक्षपदासाठी ४ नावं चर्चेत; कुणाची लागणार वर्णी?

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघ निवडणुकीत महाडिक पॅटर्न पडला मागे

Kitchen Safety Tips: किचनमध्ये गॅस सिलिंडर फ्रिजच्या जवळ का ठेवू नये? जाणून घ्या

EPFO Update : मोठी बातमी! EPF खात्यातील चुकीचं नाव किंवा जन्मतारीख घरबसल्या बदला; फक्त ५ सोप्या स्टेप्स

Palak Paneer Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी चविष्ट पालक पनीर, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT