School Denies Admission to Girl Based on Religion Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News: धर्माच्या नावाने शाळेत प्रवेश नाकारला, नागपुरातील धक्कादायक प्रकार

School Denies Admission to Girl Based on Religion: नागपूरमध्ये धर्माच्या नावाने शाळेत मुलींना प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये धर्माच्या नावाने शाळेत प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शाळा संस्था सचिवाविरोधात जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर प्राथमिक चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दयानंद आर्य कन्या विद्यालय जरीपटका नागपूर येथील शाळेच्या सचिवावावर धर्माच्या नावाने शाळेत प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. दयानंद आर्य कन्या विद्यालय जरीपटका, नागपूर या शाळेचे संस्था सचिव राजेश लालवाणी यांच्या दबावात येऊन मुस्लिम मुलींचे प्रवेश अर्ज घेऊन प्रवेश प्रलंबित ठेवले. काही मुलींच्या पालकांना प्रवेश पूर्ण झाले असून जागा नसल्याचे तोंडी कळवून प्रवेश नाकारण्यात आला.

मुलीला प्रवेश नाकारलेल्या पालकांनी अल्पसंख्यांक आयोगाकडे धाव घेतली. अल्प्ससंख्यक आयोगाकडून महिला व बाल विकास विभाग तसेच शिक्षण विभाग यांना चौकशीचे आदेश दिले. यात अधिकाऱ्यांनी चौकशी करून प्रकरणाची सत्यासत्यता लक्षात आल्यानंतर जरीपटका पोलिसात राजेश लालवानी आणि शिक्षिका अनिता आर्य यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकाराची सध्या नागपूरमध्ये चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात छताचा भाग कोसळला

Shocking : प्रेयसीला पाहायला पाहुणे आले, बॉयफ्रेंडची सटकली, असं काही केलं की...

Beed Crime: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, जेवत असताना ४० जण आले, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत...

BEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Ashapura Mata Temple : दिव्यांची आरास अन् देवीची आराधना, नवरात्रीत जा 'आशापुरा देवी'च्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT