Nagpur schools closed साम टीव्ही
महाराष्ट्र

School Closed : नागपुरातील १८ नामांकित शाळांना अचानक सुट्टी; धक्कादायक कारण आले समोर, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

Nagpur schools closed : नागपुरातील १८ नामांकित शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्यानंतर आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. सुरक्षेसाठी शाळांच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur 18 schools bomb threat latest news : नागपूर शहरातील १८ नामांकित शाळा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर आज खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व्यवस्थापनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगत संबंधित शाळांच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

धमकीच्या ई-मेलमुळे खळबळ

१९ ऑगस्ट रोजी नागपुरातील १८ प्रमुख शाळांना आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला एक संशयास्पद ई-मेल प्राप्त झाला होता. या ई-मेलमध्ये संबंधित इमारती बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या ई-मेलमध्ये '३१ ऑगस्ट' या तारखेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. यामुळे खबरदारी म्हणून शाळा प्रशासनाने आज विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.

आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि तपास

पोलीस तपासात हा धमकीचा ई-मेल बांगलादेश आणि फ्रान्स येथून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. ई-मेल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सर्व शाळांची आणि परिसराची बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे (BDDS) कसून तपासणी केली होती. या तपासणीत कोणतीही आक्षेपार्ह किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नव्हती.

पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर

धमकीत नमूद केलेली तारीख आज असल्याने पोलीस प्रशासनाकडून कोणतीही रिस्क घेतली गेलेली नाही. सर्व १८ शाळांमध्ये आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांकडून सुरक्षेची कडक अंमलबजावणी केली जात आहे. पोलिसांनी पालकांनी आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप स्वबळावर लढणार, CM फडणवीसांच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान

Maharashtra News Live Update: 7 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर कोकणवासीयांचा परतीचा प्रवास

लालबागच्या राजाच्या मंडपात अचानक शॉर्टसर्किट; मोठ्या ठिणग्यांनी भाविकांमध्ये घबराट|VIDEO

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा! बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख ठरली

बंद असलेले सर्व कबुतरखाने तातडीने सुरू करा; अन्यथा... जैन मुनींचा विधानसभा अध्यक्षांना इशारा

SCROLL FOR NEXT